मुंबईची खबर: रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल! आता, फुकट्या प्रवाशांची खैर नाही...

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या साहाय्याने बनावट तिकिटे आणि पास बनवणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

आता, फुकट्या प्रवाशांची खैर नाही...

आता, फुकट्या प्रवाशांची खैर नाही...

मुंबई तक

• 03:56 PM • 01 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई रेल्वे प्रशासनाचं मोठं पाऊल!

point

आता, फुकट्या प्रवाशांची खैर नाही...

Mumbai News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या साहाय्याने बनावट तिकिटे आणि पास बनवणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. एक विशेष 'टीटीई अॅप' (TTE App) आणि एक गाइडबूक तयार करण्यात आलं असून याच्या मदतीने तिकीट चेकर अगदी सहजपणे तिकीट किंवा पासची सत्यता तपासू शकतात. एसी लोकल, सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लास आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये बनावट तिकिटे आणि पासच्या वापराची बरीच प्रकरणे समोर येत होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अशी प्रकरणांमध्ये, AI च्या मदतीने मोठ्या प्रमाणात बनावट तिकीटे तयार केली गेली होती. 

हे वाचलं का?

बनावट तिकीटे आणि पासच्या आधारे प्रवास... 

बनावट तिकिटे आणि पास बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, परंतु मुंबईतील रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता यासंदर्भात, ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं. खरं तर, AI च्या मदतीने मोठ्या प्रमाणात बनावट तिकीटे आणि पास बनवून प्रवासी प्रवास करत असल्याचा रेल्वे अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. 

हे ही वाचा: लग्नाचं आश्वासन देऊन तरुणीसोबत नको ते केलं! नंतर, फोटो मॉर्फ करून व्हायरल करण्याची धमकी, अखेर पीडितेने वैतागून...

प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी खास अॅप 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने TTE अॅप तयार केलं असून यामध्ये प्रवाशांच्या तिकीट आणि पास नंबरची व्हॅलिडिटी चेक करता येते. तसेच, या अॅपमध्ये ऑनलाइन तिकीटावर QR कोड स्कॅन करून तिकीट चेकरला एका क्लिकमध्ये संबंधित तिकीटाची माहिती मिळेल. TTE अॅप AI आणि ग्राफिक डिझाइनच्या मदतीने बनावट तिकीट-पास तयार करणाऱ्या आणि वापरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. 

हे ही वाचा: Govt Job: ITI पास ते MBA उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, कोणत्याही परीक्षेशिवाय होणार भरती...

आतापर्यंत, जनरल लोकल ट्रेनच्या AC आणि फर्स्ट क्लासमध्ये बनावट तिकीटे/ पासची बरीच प्रकरणे समोर आली असून एकूण 7 प्रवाशांविरुद्ध वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

    follow whatsapp