Pune crime : पुण्यातील हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्याच आपल्याच ओळखीच्या तरुणाचे अपहरण केलं आणि निर्घृण हत्या केली आहे. एका जुन्या वादातून हे कृत्य घडल्याचं सांगण्यात येत आहे. फुरसुंगी येथील एका निर्जनस्थळी नेले आणि तिथेच तरुणाचा जीव घेतला. या खळबळजनक घटनेनं परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. फुरसुंगी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह तिघांनाही जेरबंद करण्यात आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी महत्त्वाचा, काय सांगतं राशीभविष्य?
नेमकं काय प्रकरण
या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच फुरसुंगी पोलिसांनी मुख्य आरोपी किरण भैरू चव्हाण (वय 32) आणि रोहित भरत गायकवाड यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात देखील घेण्यात आलं. या गुन्ह्यात समील असलेल्या इतर दोघांनी फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत पोलिसांनी पथक पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रसादवर लोखंडी रॉडसह दगडाने भीषण हल्ला
घडलेल्या घटनेनुसार, प्रसाद वीरभद्र देवज्ञे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी दुपारी आरोपींनी प्रसादला काळेपडळ येथून एका कारमध्ये बसवून त्याचे अपहरण करण्यात आले. नंतर त्याला फुरसुंगी येथील एका गणपती मंदिराच्यानजीक एका निर्जनस्थळी नेले आणि तिथे प्रसादवर लोखंडी रॉडसह दगडाने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रसादचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : आई पोलीस दलात सक्रिय, लेकीवर सावत्र बापाने बंद दाराआड केला अत्याचार, लाज आणणारी घटना
वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण आणि मृत प्रसाद यांच्यात दोन-अडीच महिन्यांपासून वाद सुरु होता. सूड उगवण्याच्या कारणाने किरणने काही साथीदारांसह अपहरणाचा आणि खुनाचा कट रचण्यात आल. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि एसपी अनुराधा उदमले यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आणि तपास सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











