पुणे : अमेरिकेत शिकलेल्या अन् तगड्या पगाराच्या मुलाशी लग्न, पण 3 महिन्यातच तरुणीने इमारतीवरुन उडी मारून जीव दिला

Pune Crime News : फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गंगासाठी तेजस बेंबळकर यांचे स्थळ सुचविण्यात आले होते. तेजस यांचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून ते पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. 17 मे 2025 रोजी कलबुर्गी येथे पाहणी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 15 जून 2025 रोजी वाकड येथे साखरपुडा झाला.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

28 Feb 2026 (अपडेटेड: 28 Feb 2026, 01:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : अमेरिकेत शिकलेल्या अन् तगड्या पगाराच्या मुलाशी लग्न

point

पण 3 महिन्यातच तरुणीने इमारतीवरुन उडी मारून जीव दिला

Pune Crime News, पुणे : शहरात पुन्हा एकदा हुंडा छळाच्या आरोपामुळे नवविवाहितेच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे तीन महिने झाले असताना बाणेर परिसरातील राहत्या इमारतीवरून उडी मारून 27 वर्षीय विवाहितेने जीवन संपविल्याची घटना घडली. या प्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मृत विवाहितेचे नाव गंगा तेजस बेंबळकर (वय 27, रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) असे आहे. तिचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय 59, रा.  कलबुर्गी, कर्नाटक) यांनी याबाबत फिर्याद दिलीये. या प्रकरणी पती तेजस शिवा बेंबळकर (वय 31), सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय 58), सासरे शिवा माणिकराव बेंबळकर (वय 62) आणि नणंद रिया शिवा बेंबळकर (वय 33) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, गंगासाठी तेजस बेंबळकर यांचे स्थळ सुचविण्यात आले होते. तेजस यांचे अमेरिकेत उच्च शिक्षण झाले असून ते पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. 17 मे 2025 रोजी कलबुर्गी येथे पाहणी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 15 जून 2025 रोजी वाकड येथे साखरपुडा झाला.

हेही वाचा : 23 वर्षीय तरुणीवर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार... नंतर, चौथ्या मजल्यावरून खाली पाडून निर्दयी हत्या!

प्राध्यापकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 20 आहेर नेले होते. त्यात कपडे, चांदीचे ताट, चांदीचा नंदी असा आहेर होता. हा आहेर पाहून तेजसची आई उज्ज्वला बेंबळकर म्हणाली की, पाहुण्यांमध्ये आमची इज्जत काढून असला भिकारी फालतु आहेर आणला आहे का?आम्ही तुम्हाला भिकारी दिसत आहोत का? आमचे कुटुंब हे प्रतिष्ठित असून आमचे पाहुणे हे उच्च वर्गातील असून त्यांच्या समोर तुम्ही असला आहेर आणला का, असे बोलू लागल्या. सर्वांसमोर प्राध्यापक कुटुंबाचा अपमान केला.

साखरपुड्यावेळी आणलेल्या आहेरावरून वधूपक्षाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे. लग्नासाठी प्रतिष्ठित मंगल कार्यालय व हॉटेलची मागणी करण्यात आली. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी आपला प्लॉट विकून सुमारे 1 लाख 80 हजार रुपये खर्च करून मंगल कार्यालय निश्चित केले. 13 नोव्हेंबर 2025 रोजी विवाह पार पडला.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर गंगाला 21 तोळे सोने आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच लग्न मनासारखे झाले नाही, असा आरोप करून तिचा मानसिक छळ करण्यात येत होता. सोलापूर येथे 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका लग्नसमारंभात गंगाने वडिलांना छळाबाबत माहिती दिली होती.

पुढे 19 फेब्रुवारी रोजी बाणेर येथील राहत्या इमारतीवरून उडी मारून गंगाने जीवन संपविले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पतीकडूनही तिला मानसिक त्रास दिला जात होता. तिला कमी लेखणे, शिक्षण व व्यक्तिमत्त्वावर टीका करणे, तसेच वैवाहिक नात्यात दुरावा ठेवणे, अशा तक्रारी गंगाने आपल्या कुटुंबीयांना व मैत्रिणींना सांगितल्या होत्या. अंत्यसंस्कारानंतर वडिलांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करत आहेत. पोलिसांकडून हुंडा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांची चौकशी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा हुंडा प्रथेविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कल्याण : 7 वर्षांचा खुशील अंगणात खेळत होता, भटका कुत्रा चावल्याने जीव गेला, वाचवण्यासाठी आलेल्या मित्रालाही...

    follow whatsapp