Pune Crime : कौटुंबिक कलहातून झालेल्या वादाने पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना कोथरूडमध्ये घडली आहे. या प्रकरणी पत्नीविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 27 वर्षीय तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत फिर्याद देखील नोंदवण्यात आली आहे. ही घटना बुधवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडल्याचे वृत्त आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! 'मी घटस्फोट देऊन तुझ्याशी...' पोलीस अधिकाऱ्याचे महिलेला लग्नाचे आमिष, नंतर लॉजवर नेत केला अत्याचार
नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, या प्रकरणात 27 वर्षीय पतीने आपल्याच पत्नीविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. ही घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वसंतनगर कोथरूड परिसरात घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पती झोपेचं सोंग करत असल्याचा पत्नीचा आरोप, पत्नीनं नवऱ्यावर फेकला चहा
बुधवारी 31 डिसेंबर रोजी तरुण हा झोपला होता. तेव्हा सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास पत्नीने पतीला झोपेतून उठवलं, नंतर आपला पती झोपेचं सोंग करत असल्याचा आरोप पत्नीनं केला होता. तेव्हा दोघांमध्ये किरकोळ वादातून नवरा-बायकोमध्ये वाद झाला.
हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, मुलीसोबत कॉफी पिल्याने जमावाकडून सुलेमानची हत्या, आरोपींना जामीन अन् कुटुंबाने भितीने गाव सोडलं!
याच वादगातून तिने गॅसवर उकळत ठेवलेला चहा पतीच्या चेहऱ्यावर टाकला. या घटनेत पतीच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT











