देहरादूनमधल्या एका डॉक्टरचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं आहे. त्यामागचं कारणही तेवढंच खास आहे. रूग्णाला ब्लड डोनर मिळत नव्हता त्यामुळे या डॉक्टरनेच त्याच्यासाठी रक्तदान केलं आहे. डॉक्टरने रूग्णाला रक्तदान केल्याने त्याला जीवदान मिळालं आहे. डॉक्टरने घेतलेल्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली घटना?
सरकारी रूग्णालयतात अनेकदा अपुऱ्या सुविधा आणि ढिसाळ व्यवस्था यामुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागतो. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. देहरादूनच्या एका डॉक्टरने माणुसकीचं दर्शन घडवत रूग्णासाठी स्वतः रक्तदाता बनण्याचा निर्णय घेतला. रूग्णाच्या शस्त्रक्रियेआधीच रक्तदान करणाऱ्या या डॉक्टरचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होतं आहे. हा अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर आहे. सोशल मीडियावर या डॉक्टरच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे.
काय घडली होती घटना?
देहरादूनमध्ये एक घटना घडली. एक व्यक्ती भल्या मोठ्या खड्ड्यात गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याच्या बरगड्या, उजवा हात आणि मांडीची हाडं फ्रॅक्चर झाली. उपचारांसाठी या रूग्णाला पी.जी. मेडिकल रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती दिवसांपासून हा रूग्ण आयसीयूमध्ये होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या मांडीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला रक्त लागणार होतं. तसं डॉक्टरांनी रूग्णाच्या नातेवाईकांनाही सांगितलं. मात्र रक्त मिळत नव्हतं म्हणून शस्त्रक्रिया करता येत नव्हती. अशात ब्लड डोनेट करण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शशांक सिंह यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. डॉ. शशांक सिंह यांच्या या कृतीचं खूप कौतुक केलं जातं आहे.
ADVERTISEMENT











