देवेंद्र फडणवीसांनी वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला देऊन मोदींना रिटर्न गिफ्ट दिलं- काँग्रेस

मुंबई तक

• 09:57 AM • 15 Sep 2022

नागपूर: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवरती तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. आता काँग्रेसनही राज्य सरकारवरती टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कागदपत्र देत शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षासोबत तसेच महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे. सरकारने वेदांत प्रकल्प वापस आणला नाही […]

Mumbaitak
follow google news

नागपूर: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवरती तुटून पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. आता काँग्रेसनही राज्य सरकारवरती टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कागदपत्र देत शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षासोबत तसेच महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आहे. सरकारने वेदांत प्रकल्प वापस आणला नाही तर या विरोधात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील लोंढे यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे काय म्हणाले?

”फॉक्सकॉन- वेदांताचा प्रश्न हा राजकारणाचा नाही. हा महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. सरकार वेदांताबाबत खोटं बोलत आहे. विशाल प्रकल्पसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 95 वी समितीची विशेष बैठक झाली होती. ही बैठक 15 जुलै 2022 ला झाली होती. 1 लाख 57 हजार कोटींचा प्रकल्प आहे. 60 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती. 1 लाख रोजगार येणार होते.” असं अतुल लोंढे म्हणाले आहेत.

अग्रवाल यांच्यावर कोणाचा दबाव आहे?. महाराष्ट्रात सर्वात जास्त स्किल लेबर आहेत. स्किल मॅनपावर महाराष्ट्रात आणि प्रोजेक्ट गुजरातला कसा?. गुजरातच्या तुलनेत राज्यात सप्लाय चेन, कस्टमर, जागा, इन्फ्रा आणि इतर बाबी राज्यात उत्तम असल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले होते. तरीही हा प्रोजेक्ट गेला असे म्हणत अतुल लोढेंनी काही पुरावे पत्रकार परिषदेमध्ये दाखवले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदींना रिटर्न गिफ्ट दिले

अतुल लोंढेनी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ”फडणवीससाहेब तुम्ही गिफ्ट दिले का …महाराष्ट्रसोबत गद्दारी नाही का? हा प्रोजेक्ट परत आला नाही तर काँग्रेस मोठे आंदोलन राज्यात करेल असा इशारा अतुल लोढेंनी दिला आहे. ”नरेंद्र मोदी सरकार १५ लाख रुपये, दोन कोटी रोजगार, १०० स्मार्ट सिटी प्रकल्प देणार होते. कुठे असतील दाखवा आम्ही त्याची वाट पाहतोय, असंही लोंढे म्हणाले.

    follow whatsapp