देवेंद्र फडणवीस म्हणजे ‘शतरंज का बादशाह’, रावसाहेब दानवेंनी केलं कौतुक

मुंबई तक

• 10:03 AM • 15 Jun 2022

देवेंद्र फडणवीस म्हणजे शतरंज का बादशाह आहेत असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होती. मतदान कुणाला केलं हे दाखवायचं असूनही फडणवीसांनी सहावा उमेदवार निवडून आणला. हे त्यांचं कौशल्य आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीतही आघाडीचा ‘कार्यक्रम’ […]

Mumbaitak
follow google news

देवेंद्र फडणवीस म्हणजे शतरंज का बादशाह आहेत असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होती. मतदान कुणाला केलं हे दाखवायचं असूनही फडणवीसांनी सहावा उमेदवार निवडून आणला. हे त्यांचं कौशल्य आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

विधान परिषद निवडणुकीतही आघाडीचा ‘कार्यक्रम’ होणार?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

२०१९ ला विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा शिवसेना भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेने दगा केला, देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी प्रचारात सांगितलं तेव्हा शिवसेनेने काहीही म्हटलं नाही. मात्र निकाल लागला तेव्हा म्हणू लागले आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत. शिवसेनेने दगाफटका केला आहे असा आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना या ठिकाणी केला. जालन्यातल्या जल आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय.

फडणवीसांबद्दल काय म्हणाले दानवे?

देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं दानवे यांनी म्हटलंय. राज्यसभेच्या वेळी आपल्याकडे मतं कमी होती. मात्र आपल्या देवेंद्र फडणवीसांनी अशी किमया करून दाखवली की आपला एक खासदार जास्त निवडून आला असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

आज आपल्या आग्रहासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत. जालन्यात ते सहा वेळा आले आहेत. त्यांच्या काळात त्यांनी या शहरासाठी विकासकामं केली. आत्ताचं सरकार ५८ एमलडी पाण्याची गरज असूनही आपल्याला १५ एमएलडी पाणी मिळतं. असं असल्यानंतर आपल्या आया, बहिणी रस्त्यावर उतरणारच ना? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीला विचारला आहे.

राज्यसभा निवडणूक: फडणवीसांनी दिवसभर एकही प्रतिक्रिया दिली नाही, मध्यरात्री ‘डाव’ पलटला अन् पहाटे..

जालन्याकडे महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केलंय. म्हणूनच हा आक्रोश मोर्चा निघाला आहे. २०१९ ला निवडणुका झाल्या, त्यावेळी भाजप-शिवसेना युती होती. शिवसेनेने नरेंद्र मोदींचा फोटो दाखवूनच मतं मागितली. त्यावेळी शिवसेनेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील या भाषणांमधल्या दाव्यांवर ते शांत राहिले.

शिवसेनेने काय केलं आपण पाहिलं. चोर कोण आहे ते आपल्याला कळलं आहे. आता या चोराला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत फटके लगावल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही असं रावाबसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जलआक्रोश मोर्चाची दखल आता ठाकरे सरकारने घेतली पाहिजे. या शहरातले चांगले रस्ते हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाले. आज आपलं सरकार असतं तर समृद्ध महामार्गही पूर्ण होऊन सुरू झाला असता असंही रावसाहेब दानवेंनी यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp