Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. 19 डिसेंबरच्या रात्री शेकोटी पेटवून मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या तरुणाला नऊ जणांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडित तरुणाने वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित तरुणाचे नाव यासीन जब्बार शेख (वय 24) असे आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पनवेलमध्ये पुरुष लेडिज डब्ब्यात शिरला, महिलांनी जाब विचारताच धावत्या लोकलमधून विद्यार्थीनीला बाहेर फेकलं, सर्वत्र संताप
नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, यासीन हा आपल्या मित्रांसोबत त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शेकोटी करून बसला होता. तेव्हाच आरोपी ओंकार झोंबाडे हा त्याच्याकडे आले आणि त्याने तू माझ्याकडे रागानं का बघतोय? असा प्रश्न केला. नंतर वाद वाढत गेला तेव्हा झोंबाडेने आपल्यासह इतर 8 जणांना बोलावले. नंतर लोखंडी रॉडसह लाकडी दांडक्यांनी यासीनवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात यासीन हा गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
आठ जणांवर पोलिसांकडून कारवाई
या प्रकरणात आठ जणांची नावे समोर आली आहेत. पोलिसांनी ओंकार झोंबाडेसह तुषार काकडे, दाद्या बगाडे, रोहन पिंगळे, कैलास काकडे, मोन्या कुचेकर, देव शिरोळे. दीपू शर्मा, किशोर काकडे यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरु ठेवला आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हे ही वाचा : 'तिचा नाद सोडा...' सरपंच पत्नीच्या नवऱ्याचे बाहेरच्या महिलेशी प्रेमसंबंध, कंटाळलेल्या बायकोनं उचललं टोकाचं पाऊल
दरम्यान, पुण्यात अनेक गुन्हेगारीच्या टोळ्या तयार होत आहेत. यामुळे राज्याचे सांस्कृतिक शहर असलेल्या पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची नोंद वाढलेली आहे. या प्रकरणात आता स्थानिक रहिवाशांनी आरोपींवर कठोर करावाई करावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे.
ADVERTISEMENT











