अंजली दमानिया यांनी केलेले एकही आरोप टीकलेला नाही. त्यांना कदाचित परत राजकारणात यायचं असेल. आधी ऑफिस ऑफ प्रॉफीटचा विषय काढला, आता हे आरोप केले. अंजली दमानियांनी बदनामियांनी केलेला एकही आरोप टीकला नाही असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Elections : संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा, निवडणूक आयोगाला नोटीस
अंजली दमानिया 50 दिवसांपासून रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा मर्डर झाल्याचं त्या म्हणाल्या होत्या. सनसनाटी निर्माण करण्यापलीकडे दुसरं काहीही दिसत नाही असं मुंडे म्हणाले. माझ्यावर मिडिया ट्रायल सुरू आहे. DBT मध्ये काय असावं आणि काय नसावं, एखादी गोष्ट वगळण्याचे किंवा समाविष्ट करण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांचे असतात. या प्रकरणातही याच पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली होती.
अंजली दमानिया यांचा पुढचा आरोप खोडताना धनंजय मुंडे म्हणाले, त्या शेतकरी आहेत की नाही माहित नाही. जो शेतकरी आहे त्याला माहिती आहे की, शेतीमध्ये मान्सूनपूर्वी मशागत करावी लागते.
हे ही वाचा >> Anjali Damania : "धनंजय मुंडेंकडून 280 कोटींचा घोटाळा", दमानियांनी सांगितलेले आकडे जसेच्या तसे वाचा
निविदाप्रक्रिया पूर्वमान्यतेनेच राबवण्यात आली होती. म्हणून, एप्रिल-मे महिन्यात आचारसंहिता आणि खरीप हंगाम लक्षात घेऊन सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च माहिन्यात करण्यात आली आहे. फवारणी कधी करावी लागते, तण कधी काढवं लागतं हे अंजली दमानिया यांना माहिती नसेल. नॅन युरिया आणि DFA बद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. आजही चौकशी करा हे माझं नॅनोची किंमत काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत एकच आहे. त्यापेक्षाही कमी दरात नॅनो खताची खरेदी करुन 4 लाख शेतकऱ्यांना देण्यात आली असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता यावर अंजली दमानिया काय बोलणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
