Anjali Damania : "धनंजय मुंडेंकडून 280 कोटींचा घोटाळा", दमानियांनी सांगितलेले आकडे जसेच्या तसे वाचा
युरिया, नॅनो युरिया, कापूस गोळा करण्याची बॅग, स्प्रे महागात खरेदी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अंजली दमानिया यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाला घोटाळा"

अंजली दमानिया यांनी सांगितले धक्कादायक आकडे
Anjali Damania : एक कृषी मंत्री कसे पैसे खातो याचे कथित पुरावे घेऊन आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया माध्यमांसमोर आल्या. धनंजय मुंडे यांनी जुलै 2023 ते 2024 या एका वर्षात 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडे यांनी रात्रीच्या रात्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आणि त्यांनी सही घेतली आणि हा प्रकार केला असा आरोप अंजनी दमानिया यांनी केला. 12 मार्चला एक जीआऱ निघाला, तेव्हा कृषी आयुक्त प्रविण गेडाम होते. नॅनो युरिआ, नॅनो डीएपीच्या 5 वस्तु खरेदीत मुंडेंनी भ्रष्टाचार केला. अजितदादा, शिंदेंची सही घेऊन मुंडेंनी ही स्कीम राबवली असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
अंजली दमानिया यांनी सांगितलं की, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले होते. राज्य सरकारलाही आदेश बंधनकारक होते. मात्र, धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांच्या कृषीखात्याने शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियमांचं उल्लंघन केलं. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी करण्यात आल्या. तसंच वस्तू खरेदी करताना बाजारभावाच्या तुलनेत जास्त पैसे दिले असा दावा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला.
"कृषी मंत्र्यांनी कृषी माल महागात खरेदी केला"
1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या
2. नॅनो DFA : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.
3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.
4. मेटाल्डिहाईड (PI Industries Petant Product) : 1275 रुपयांनी 1,96,000 किलो विकत घेतलं.
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या
मालाची खरी किंमत कमी?
अंजली दमानिया यांनी लाईव्ह प्रेसमध्ये याच मालाचे ऑनलाईन दर दाखवले.