भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची का गरज आहे? अजितदादांनी महायुतीशी कसं संतुलन राखलं होतं?

Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबच नाहीतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजितदादांच्या जाण्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे महायुती सरकारमध्ये असणं हे सरकारसाठी कशा पद्धतीने जमेची बाजू होती ते समजून घेऊयात. 

ajit pawar and devendra fadanvis political chemistry in mahayuti

ajit pawar and devendra fadanvis political chemistry in mahayuti

मुंबई तक

• 02:36 PM • 29 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री

point

भाजपला अजितदादांची गरज का होती? 

Ajit Pawar Death : राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. आज गुरुवार 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबच नाहीतर अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. अजितदादांच्या जाण्याने भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे महायुती सरकारमध्ये असणं हे सरकारसाठी कशा पद्धतीने जमेची बाजू होती ते समजून घेऊयात. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ajit Pawar: अवघा महाराष्ट्र पोरका... उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक चांगली केमिस्ट्री होती. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय ढाल बनून राज्य चालवत होते. अजित पवार यांच्या जाण्याने अचानकप विधानाने राज्याचे राजकीय चित्र हे काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. तसेच महायुती सरकारमधील काही समीकरणे बदलण्याची अधिक शक्यता आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजकीय युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महायुतीतत नियंत्रणात आणलं जायचं. आता अजित पवार यांच्या निधनाने महायुतीची सत्तेची समीकरणे बिघडू लागल्याचं बोललं जातंय. महायुतीत अजित पवार यांचं असणं भाजपसाठी किती महत्त्वाचं होतं, त्यांची राजकीय केमिस्ट्री पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.  

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपहून वैचारिक पातळीवर वेगळा पक्ष आहे. पण असे असले तरीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध होते. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि नंतर महाविकास आघाडीशी हात मिळवणी केली होती, तेव्हा अजित पवारांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीची सत्ता स्थापन केली.  

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेसोबत गेल्यानंतर भाजपला मुख्यमंत्री पदासाठी तडजोड करावी लागली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकीय संतुलन राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेतले होते. अजित पवार यांनी देखील 40 आमदारांना सोबत घेतलं आणि महायुती सरकारच्या सत्तेत राहिले होते. संख्याबळासाठी भाजपने अजितदादांना आपल्या सोबत घेतलं होते. 

2024 मध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता. 288 पैकी त्यांनी 132 जागांवर विजय मिळवला होता. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले, त्यासाठी भाजपने वैयक्तिक पातळीवर काही प्रमाणात तडजोड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित पवार यांनी युती टिकवण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. 

एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांच्या पक्षांचे विचार तसे वेगवेगळेच, पण अजित पवार यांच्या निधनाने महायुतीच्या सरकारमधील चित्र बदलण्याची संभावना अधिक असल्याचे वृत्त आहे. 

भाजपला अजितदादांची गरज का होती? 

भाजपचे 132 आमदार आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार महायुतीतून निवडून आले होते. हा आकडा 288 विधानसभा निवडणुकीच्या जागांपैकी आहे. सद्यस्थितीत अजित पवार यांचे 40 आमदार जरी महायुतीपासून जरी वेगळे झाले तरी फडवणवीस सरकारला कोणता धोका राहणार नाही. तसेच भाजपला राष्ट्रवादीची का गरज आहे? अजित पवार यांच्या निधनाने राज्यातील भाजपचे सत्ता संतुलन बिघडण्याची अधिक शक्यता आहे का? असा प्रश्न अनेकांना उपस्थित होऊ लागला आहे.  

हे ही वाचा : आमचा दादा लय रुबाबदार, अजूनही विश्वास बसत नाही, अजितदादांबद्दल आदर्श शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

दरम्यान, अजित पवारांमुळे भाजपने एकमेकांशी चांगले संतुलन राखण्याचे प्रयत्न ठेवले होते. अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर महायुतीत चित्र बदलण्याची शक्यता आहे. पण, यावर ठोसपणे सांगता येत नाही, परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस यांना वास्तव स्वीकारून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. 
 

    follow whatsapp