Akola News, धनंजय साबळे : अकोला महानगरपालिकेत मोठा उलटफेर झाला असून शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे अकोला महानगरपालिकेत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नाशिक : महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, ज्योतिषाला अटक; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगून आलेला चर्चेत
रात्री दोन वाजता पक्षप्रवेश
नुकत्याच झालेल्या महापानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आले होते. यापैकी चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी रात्री दोन वाजता हा पक्षप्रवेश पार पडला. या चार नगरसेवकांसोबतच जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाकडे उरले फक्त दोन नगरसेवक
शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये मनोज पाटील, सागर भारुका, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या नगरसेवकांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशानंतर आता अकोला महापालिकेत ठाकरे गटाकडे फक्त दोनच नगरसेवक उरले आहेत. पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर महापौरपदासाठी दिलेल्या उमेदवार सुरेखा काळे यांचाही समावेश असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : Personal Finance: जबरदस्त... तुमच्या Saving Account मधील पैशांवर मिळवा FD सारखे व्याज
ठाकरे गटाचे टेन्शन वाढले
याआधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही ठाकरे गटाला झटका बसला होता. ठाकरे गटाने शिस्तभंगाची कारवाई करत नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशांमुळे ठाकरे गटाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
ADVERTISEMENT











