गैंरो पे करम, अपनों पे सितम! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग, आमदारांनी गद्दारी केल्याने काँग्रेसची फजिती!

Rajya Sabha Election 2026 : 16 मार्च रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालेले पाहायला मिळाले. शिवाय आमदारांचे गायब होणे किंवा मतदानापासून दूर राहिल्याने बाजी पलटली. हरियाणामध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांच्या मतांवर भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली, तर बिहारमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीप्रमाणेच 'क्लीन स्वीप' दिला.

Rajya Sabha Election 2026

Rajya Sabha Election 2026

मुंबई तक

17 Mar 2026 (अपडेटेड: 17 Mar 2026, 04:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गैंरो पे करम, अपनो पे सितम! राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग

point

आमदारांनी गद्दारी केल्याने काँग्रेसची फजिती!

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेच्या 37 जागांपैकी बिहार, हरियाणा आणि ओडिशामधील केवळ 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. कारण 26  जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तरीही, या तीन राज्यांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या ज्यामुळे अनेक उमेदवारांना विजय निश्चित वाटत असताना पराभवाला सामोरे जावे लागले. यात बिहारमधील क्रॉस वोटिंग सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. 

हे वाचलं का?

ज्या 11 जागांवर निवडणूक झाली, त्यापैकी 9 जागांवर NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) किंवा एनडीए समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला आहे. उर्वरित दोन जागांपैकी एक काँग्रेस आणि एक BJD च्या वाट्याला आली आहे. काँग्रेसला जवळपास सर्वच ठिकाणी स्वतःच्या आमदारांनी दगा दिला असून, बिहारमध्ये पक्षाची सर्वाधिक नाचक्की झाली आहे.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी बसप (BSP) नेत्या मायावती आणि एआयएमआयएम (AIMIM) नेते असदुद्दीन ओवैसी यांचा पाठिंबा मिळवला होता, परंतु काँग्रेस अन् आरजेडीच्या एका आमदाराने ऐनवेळी दगा दिल्याने त्यांचे गणित बिघडले.

कुठे-कुठे झाली क्रॉस व्होटिंग?

16 मार्च रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालेले पाहायला मिळाले. शिवाय आमदारांचे गायब होणे किंवा मतदानापासून दूर राहिल्याने बाजी पलटली. हरियाणामध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांच्या मतांवर भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणी उशिरा सुरू झाली, तर बिहारमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीप्रमाणेच 'क्लीन स्वीप' दिला.

बिहारमध्ये परक्यांची साथ मिळाली, पण स्वकीयांकडून दगा

बिहारमध्ये एनडीएच्या चार जागा आधीच निश्चित होत्या. पाचव्या जागेवर विजयासाठी एनडीएला 3 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती, तर महाआघाडीला 6 आमदारांची आवश्यकता होती. महाआघाडीसाठी 6 आमदार जमवणे कठीण होते, तरीही तेजस्वी यादव यांनी ओवैसी आणि मायावतींना मनवण्याचे प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. परंतु, राज्यसभेच्या निवडणुकीत खरी खेळी मतदानादरम्यान खेळली जाते. ओवैसींच्या पक्षाच्या (AIMIM) 5 आमदारांचा आणि मायावतींच्या (BSP) 1 आमदाराचा पाठिंबा आधीच निश्चित झाला होता, त्यामुळे आरजेडी उमेदवाराचा विजय पक्का मानला जात होता. मात्र, मतदानापूर्वीच आरजेडीचा 1 आमदार आणि काँग्रेसचे 3 आमदार 'नॉट रिचेबल' झाले. महाआघाडीच्या या 4 आमदारांनी मतदान न केल्यामुळे एनडीएच्या पाचव्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला. परिणामी, एनडीएचे पाचही उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये जेडीयू नेते  नितीश कुमार, भाजपचे नितीन नबीन, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर आणि भाजपचे शिवेश राम यांचा समावेश आहे.

हेही वाचा : दहावीची परीक्षा सुरु असताना शिक्षकाने सात विद्यार्थीनींशी केले अश्लील कृत्य, परीक्षेदरम्यान परिसरात गदारोळ

क्रॉस व्होटिंगची जणू परंपराच बनली!

2022 च्या राज्यसभा निवडणुकीत हरियाणातून अजय माकन आणि 2024 मध्ये हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव काँग्रेससाठी मोठा धक्का होता. 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये नेण्यात आले होते. तेव्हा अहमद पटेल यांची निवडणूक धोक्यात आली होती, परंतु सोनिया गांधींनी सूत्रे हाती घेत आपल्या राजकीय सचिवांना राज्यसभेवर पाठवले होते. 2024 मध्ये फेब्रुवारीत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत क्रॉस व्होटिंग झाले. त्यावेळी भाजपच्या एका आमदारानेही क्रॉस व्होटिंग केल्याची बातमी आली होती.

1.  हिमाचल प्रदेश: भाजपचे केवळ 25 आमदार होते, तरीही काँग्रेसच्या 6 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. काँग्रेस सत्ताधारी असूनही 3 अपक्ष आमदारांची मते भाजपला मिळाली. भाजपचे हर्ष महाजन विजयी झाले, तर अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला. (सिंघवी यावेळी मात्र बिनविरोध निवडून आले आहेत).

2.  उत्तर प्रदेश : 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, ज्यामुळे भाजपने 8 जागा जिंकल्या आणि सपाला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले.

3.  कर्नाटक: येथे काँग्रेसला सत्तेत असल्याचा फायदा झाला आणि 4 पैकी 3 जागा जिंकल्या. भाजपच्या एका आमदाराने (एस. टी. सोमशेखर) काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांना मतदान केले, तर दुसऱ्या एका भाजप आमदाराने मतदानाकडे पाठ फिरवली.

क्रॉस व्होटिंग का होते?

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या मते, राज्यसभा निवडणूक काँग्रेससाठी मोठे आव्हान होते, परंतु त्यांनी ते पेलले. हरियाणात दोन्ही पक्षांना 1-1 जागा मिळाल्याने ही लढत बरोबरीत सुटल्यासारखी आहे. हुड्डा यांनी या विजयाला 'लोकशाहीचा विजय' म्हटले आहे. याउलट मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की, काँग्रेसचा आपल्याच आमदारांवर विश्वास नसल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

बिहारमधील निकालांनी तेजस्वी यादव यांच्या जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. ते म्हणाले, "आमच्या आमदारांनी दगा दिला नसता तर आमचा विजय निश्चित होता. यंत्रणा कोणाच्या हातात आहेत हे सर्वांना माहीत आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत भाजपशी लढत राहू. भाजपने धनशक्ती आणि यंत्रणेचा गैरवापर करून भीती व खरेदी-विक्रीचे जे राजकारण सुरू केले आहे, त्याचा अंत नक्कीच होईल."

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दहावीची परीक्षा सुरु असताना शिक्षकाने सात विद्यार्थीनींशी केले अश्लील कृत्य, परीक्षेदरम्यान परिसरात गदारोळ
 

    follow whatsapp