महाराष्ट्राची अवस्था बघून अस्वस्थ झालात? शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज

मुंबई तक

15 Mar 2026 (अपडेटेड: 15 Mar 2026, 02:50 PM)

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्यासाठी मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिले जाते. याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नुकतेच 20 वर्षे पूर्ण झाले आहेत. तसेच 19 मार्च रोजी दरवर्षी प्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे मेळावा घेणार आहे. त्याच मेळाव्याचा टीझर समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. 

Raj Thackeray

Raj Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गुढीपाडवा मेळावा मनसेचा टीझर

point

टीझरमधून महाराष्ट्राला विचारले 'ते' प्रश्न

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्यासाठी मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे पाहिले जाते. याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नुकतेच 20 वर्षे पूर्ण झाले आहेत. तसेच 19 मार्च रोजी दरवर्षी प्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे मेळावा घेणार आहे. त्याच मेळाव्याचा टीझर समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई : कॅमेरा असल्याचं माहिती नाही, महिलेने लिफ्टमध्ये तरुणाला किस केलं, व्हिडीओ थेट सोसायटीच्या ग्रुपवर पडला

टीझरमधून महाराष्ट्राला विचारले 'ते' प्रश्न

टीझर बघितल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. टीझरच्या सुरुवातीलाच संबंध महाराष्ट्राला विचारलेले प्रश्न असे की, महाराष्ट्रात जे चाललंय ते पटत नाहीये? रोजच्या घडत असलेल्या घटना पाहून मनस्ताप होतोय? महाराष्ट्राची ही अवस्था बघून तुम्ही अस्वस्थ झाला आहात? तुम्ही एकटे नाहीत, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला असंच वाटतंय. चला शिवतीर्थावर भेटूया, उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरवूया, असे टीझरच्या मेळाव्यात नमूद करण्यात आले. 

टीझरच्या शेवटी गुढीपाडवा मेळावा स्थळ आणि वेळ नमूद करण्यात आली आहे. मेळावा हा शिवतीर्थावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतील याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. 

हे ही वाचा : मंत्र्याच्या बेडरुममध्ये बाहेरची महिला, बायकोने फोटो काढण्याचा प्रयत्न करताच खळबळ, पण 2 दिवसात सगळं मिटलं!

दरम्यान, टीझरमधील विचारण्यात आलेले प्रश्न हे सध्या राज्यात सुरु असलेलं राजकारण आणि समाजकारणाशी निगडित असल्याचं दिसून येत आहेत. याचवरून राज ठाकरे आता उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरवण्यासाठी काय बोलतील हे पाहणं गरजेचं आहे.