शेवटची 'ती' 26 मिनिटं, Runway समोर असूनही... लँडिंगपूर्वी अजित पवारांच्या विमानात नेमकं काय घडलं?

अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वीच्या शेवटच्या 26 मिनिटांत विमानाने बारामतीशी संपर्क साधला होते, धावपट्टी दिसत नसताना त्यांनी पुन्हा विमान हवेत घिरट्या मारल्या होत्या. सकाळी 8.43 वाजता शेवटच्या वेळी लँडिंगची परवानगी मिळाली आणि त्यानंतर संपर्क तुटला.

those last 26 minutes pilot did not saw runway know what happened in ajit pawar plane before landing

लँडिंगपूर्वी अजित पवारांच्या विमानात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 01:43 PM • 29 Jan 2026

follow google news

बारामती: बारामती बुधवारी (28 जानेवारी) येथे झालेल्या चार्टर विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला. विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला होता. पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-वैमानिक शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

हे वाचलं का?

विमान कोसळण्यापूर्वी सुमारे 35 मिनिटे ते हवेत होते. ते बॉम्बार्डियर लर्नजेट 45, नोंदणीकृत VT-SSK होते, जे मुंबईहून बारामतीला उड्डाण करत होते आणि दिल्लीस्थित खाजगी जेट ऑपरेटर VSR व्हेंचर्स (VSR एव्हिएशन) द्वारे चालवले जात होते. विमानाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 8:10 वाजता उड्डाण केलेलं आणि बारामतीला रवाना झालं होतं.

अपघाताच्या 26 मिनिटे आधी...

अपघातापूर्वीच्या शेवटच्या 26 मिनिटांची माहिती समोर आली आहे:

- विमानाने प्रथम सकाळी 8.18 वाजता बारामतीशी संपर्क साधला.
- त्यानंतर विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर पुढील संपर्क साधला आणि त्यांना उतरण्याचा सल्ला देण्यात आला.
- विमानतळाजवळ आल्यानंतर, धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकांनी लँडिंग पुढे ढकलले.
- त्यानंतर विमानाने पुन्हा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला.
- सकाळी 8.43 वाजता विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली, परंतु त्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
- सकाळी 8.44 वाजता, अपघातग्रस्त विमानातून प्रचंड मोठ्या ज्वाळा दिसून आल्या.

हे ही वाचा>> Ajit Pawar: पवार कुटुंबियांनी घेतलं अजितदादांचं शेवटचं दर्शन, राजकीय नेत्यांची उपस्थिती...

बारामतीमध्ये अंत्यसंस्कार

अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी, त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानावर ठेवण्यात आले होते, जिथे लोकांनी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

हे ही वाचा>> कार्यकर्ते धाय मोकलून रडले ,अजितदादांना अखेरचा निरोप देताना लाखोंचा जनसागर हळहळला

अजित पवार यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठे नुकसान मानले जात आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या अपघाताची चौकशी करत आहे आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA)ने विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला आहे.

    follow whatsapp