डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आणखी एका दोघांना अटक, एकूण 33 जण अटकेत

दिव्येश सिंह

• 08:08 AM • 27 Sep 2021

Dombivali gangrape प्रकरणात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आता एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीचं हे प्रकरण मागच्या आठवड्यात उघडकीस आलं. मागच्या आठवड्यात पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं. आधी 21 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 28 आणि आता एकूण 33 जणांना अटक […]

Mumbaitak
follow google news

Dombivali gangrape प्रकरणात डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आता एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीचं हे प्रकरण मागच्या आठवड्यात उघडकीस आलं. मागच्या आठवड्यात पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं. आधी 21 जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 28 आणि आता एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात 33 आरोपी आहेत. त्यातल्या 29 जणांन अटक करण्यात आली आहे. जे नवे आरोपी पकडण्यात आले आहेत त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येते आहे. इतर आरोपींना 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातले दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

मुंबई हादरली! निर्भया घटनेची पुनरावृत्ती; महिलेवर बलात्कार करून क्रूर कृत्य

अल्पवयीन मुलीने काय म्हटलं आहे?

‘ आमच्या घरी येणं जाणं असलेला एक मित्र होता. जानेवारी महिन्यात तिला भेटण्यासाठी सकाळी 9.40 च्या सुमारास त्याचा (मुख्य आरोपी) फोन आला. पीडित मुलगी सकाळी 11 च्या सुमारास त्याला भेटायला गेली. तर मुख्य आरोपी ऑटो चालवणाऱ्या त्याच्या मित्रासोबत आला होता. ते एका मैत्रिणीच्या घरी जात होते. वाटेत दुसरा मुलगा त्यांच्यासोबत ऑटोमध्ये बसला.’

‘मात्र, मैत्रिणीच्या घरी जाण्याऐवजी पीडितेला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. मुख्य आरोपीने पीडितेला तिच्या खासगी फोटोंसह ब्लॅकमेल केले, जे तिने पूर्वी (डिसेंबर 2020) त्याच्यासोबत शेअर केले होते. नंतर मुख्य आरोपीने पीडितेवर बलात्कार केला तिसऱ्या आरोपीने व्हीडिओ चित्रित केला. नंतर तिन्ही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला,’ असं फिर्यादीत लिहिण्यात आलं आहे.

त्यानंतर पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह राहण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेली. या दरम्यान मुख्य आरोपी तिला सतत फोन करायचा, पण ती त्याचे कॉल टाळत होती.

20 फेब्रुवारी, 2021 रोजी मुख्य आरोपीने तिला वेगळ्या क्रमांकावरून फोन केला आणि तिला भेटायला सांगितलं पण तिने नकार दिला.

दुसऱ्या दिवशी तो तिच्या घराजवळ गेला आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली की, तो तिच्या कुटुंबाला व्हीडिओ दाखवेल आणि सार्वजनिक करेल. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.

मुख्य आरोपी तिला डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे 9 मुलं उपस्थित होती. त्यातील तिघांनी तिच्यावर जानेवारीमध्ये बलात्कार केला होता.

मुख्य आरोपीने तिला गुंगीचे औषध टाकून पाणी दिले. यामुळे ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा तिच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. दरम्यान, तिला दरवेळी अशी धमकी देऊन तिला विविध ठिकाणी नेलं जात होतं.

त्यानंतर 15 मे, 2021 रोजी पीडित तरुणी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हीडिओ शेअर करण्यात आला आणि धमकी देऊन पीडितेला दारू पाजण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित असलेल्या 11 मुलांनी तिच्यावर बलात्कार केला.

नंतर 22 सप्टेंबर, 2021 रोजी पुन्हा 5 जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर पीडितेने तिच्या पालकांनी या घटनांबाबत माहिती दिली.

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली रिक्षाही डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी जप्त केली आहे. आता याप्रकरणातल्या सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काय काय सत्य समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp