महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी Corona रूग्णसंख्येत घट, 2844 नवे रूग्ण

मुंबई तक

• 03:23 PM • 28 Sep 2021

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसभरात 2844 नव्या रूग्णांची नोंद दिवसभरात झाली आहे. सोमवारी ही संख्या 2432 इतकी होती. दरम्यान आज दिवसभरात देशातही साडेसहा महिन्यांनी कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट पाहण्यास मिळाली. महाराष्ट्रात दिवसभरात 3029 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 65 हजार 277 कोरोना बाधित […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसभरात 2844 नव्या रूग्णांची नोंद दिवसभरात झाली आहे. सोमवारी ही संख्या 2432 इतकी होती. दरम्यान आज दिवसभरात देशातही साडेसहा महिन्यांनी कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट पाहण्यास मिळाली.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात दिवसभरात 3029 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 65 हजार 277 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.26 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 60 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 5 कोटी 84 लाख 29 हजार 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 44 हजार 606 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 54 हजार 985 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 1514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात आज घडीला 36 हजार 794 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2844 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 44 हजार 606 इतकी झाली आहे.

Big News! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं खुली होणार!

मुंबईत 394 नवे रूग्ण

मुंबईत दिवसभरात 394 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 477 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 18 हजार 813 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. मुंबईत सध्या 4611 सक्रिय रूग्ण आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागली आहे. त्या अनुषंगाने निर्बंध आणखी शिथील करण्यात येत आहेत. राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडत आहेत. तर 7 ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून सगळी मंदिरं आणि धार्मिक स्थळं उघडणार आहेत. तर 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स आणि नाट्यगृहंही सुरू केली जाणार आहेत. कोरोना प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करून या ठिकाणी लोकांनी जावं अशी मुभा देण्यात आली आहे.

    follow whatsapp