उस्मानाबाद हादरलं, ४ वर्षीय चिमुरडीवर चॉकलेट देतो म्हणून केला अत्याचार

मुंबई तक

19 Jul 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

उस्मनाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 4 वर्षीय चिमुरडीवर गावातीलचं नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक समोर आला आहे. चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्ररीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक वृत असे की, जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील […]

Mumbaitak
follow google news

उस्मनाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 4 वर्षीय चिमुरडीवर गावातीलचं नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक समोर आला आहे. चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्ररीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

याबाबत अधिक वृत असे की, जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील एका गावात ४ वर्षीय चिमुकली बालवाडीत गेली होती. त्यादरम्यान गावातीलच १८ वर्षीय तरुणाने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावलं. चॉकलेटचं कारण सांगत तीला गावातील एका पडक्या वाड्यात नेलं आणि तिथेच तिच्यावर त्या नराधमाने लैंगिक अत्याचार केले. रडत घरी जाऊन त्या चिमुकलीने झालेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. हे ऐकताच पिडीतेच्या घरच्यांना धक्काच बसला. तिने ज्याठिकाणी घटना घडली तो पडका वाडा घरच्यांना दाखवला. संतापलेल्या पिडीतेच्या कुटुंबियांनी थेट लोहारा पोलीस स्टेशन गाठले.

सदरील अत्याचाराची घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरिक्षक आनंदराव वाठोरे, उपनिरिक्षक अनुसया माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरुन १८ वर्षीय तरुणाच्या विरोधात लोहारा पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लोहारा पोलीसात कलम 376, पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अद्याप अटक नसून वरिष्ठस्तरावर त्याचा तपास सुरु असल्याचं लोहारा पोलीस अधिकारी काकडे यांनी दिली.

या हदरवणाऱ्या घटनेमुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरत आहे.मागच्या काही दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. त्यामुळे अशा होणाऱ्या घटनांना आळा बसणं गरजेचं आहे. नुकतंच पिंक सिटी ओळख असलेल्या नागपुरात देखील एका अल्पवयीन तरणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. आणि हा अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पोलीस उपनिरीक्षक आहे. कायद्याच्या रक्षकाने दुष्कृत्य केल्याने विश्वास ठेवायचा कुणावर असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

    follow whatsapp