Ganesh Chaturthi 2022: लाडक्या बाप्पाचं आगमन, राशीनुसार काय नैवैद्य दाखवायचा? जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2022 भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे दहा दिवस हा उत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि पूजाही करतात. गणपती ही बुद्धिची देवता आहे. लाडक्या बाप्पाला राशीप्रमाणे काय नैवैद्य दाखवायचा किंवा काय […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:00 AM • 31 Aug 2022

follow google news

Ganesh Chaturthi 2022 भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असे दहा दिवस हा उत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात आणि पूजाही करतात. गणपती ही बुद्धिची देवता आहे. लाडक्या बाप्पाला राशीप्रमाणे काय नैवैद्य दाखवायचा किंवा काय अर्पण करायचं आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचलं का?

कोणत्या राशीच्या लोकांनी गणपतीला काय अर्पण करावं?

मेष रास: तुमची रास जर मेष असेल तर गणपतीला गणेश चतुर्थीच्या दिवशी बुंदीच्या लाडूचा नैवैद्य दाखवा. तुम्ही जर आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर तुमच्या त्या अडचणी दूर होतील.

वृषभ रास: तुमची रास वृषभ असेल तर तुम्ही गणपतीला मोदकांचा नैवैद्य दाखवा. मोदक गणपतीला खूप प्रिय आहेत. वृषभ राशीच्या लोकांनी मोदकांचा नैवैद्य दाखवल्याने त्यांचं मनोरथ पूर्ण होईल.

मिथुन रास: मिथुन राशीच्या लोकांनी गणपतीला ११ किंवा २१ दुर्वांची जुडी वहावी. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. एवढंच नाही तर असं केल्याने बाप्पा या राशीच्या लोकांना ज्ञान आणि बुद्धीचा आशीर्वादही देईल.

कर्क रास: कर्क राशीच्या लोकांनी गणपतीला बर्फीचा नैवैद्य दाखवावा. त्यामुळे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील

सिंह राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला गुळाचा नैवैद्य दाखवावा, त्यामुळे गणेशाची कृपा तुमच्यावर होईल.

Ganesh Utsav 2022 : देवा श्रीगणेशा! लालबागच्या राजाचे खास फोटो

इतर राशींनी काय नैवैद्य दाखवावा किंवा काय अर्पण करावं?

कन्या राशीच्या लोकांनी गणपतीला मूगाचा शिरा किंवा मूगाचा हलवा याचा नैवैद्य दाखवावा. यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

तूळ राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाल बुंदीच्या लाडूंचा नैवैद्य दाखवावा. त्यामुळे गणेशाची कृपा या राशीच्या लोकांवर होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला बुंदीचे लाडू आणि बेसनाचे लाडू यांचा नैवैद्य दाखवावा, त्यामुळे या राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील

धनु राशीच्या लोकांनी दहा दिवस गणपतीला केळी नैवैद्य म्हणून दाखवावी, असं केल्यास या राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण होतील.

मकर राशीच्या लोकांनी मोतीचूरचे लाडू गणपतीला नैवैद्य म्हणून दाखवावेत त्यामुळे या राशीच्या लोकांच्याही मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

कुंभ राशीच्या लोकांनी गणरायाला बुंदीच्या लाडूंचा नैवैद्य दाखवावा, त्यामुळे तुम्ही जे काम करायला जाल ते निर्विघ्नपणे पार पडेल.

मीन राशीच्या लोकांनी बेसनाचे लाडू किंवा बुंदीचे लाडू यांचा नैवैद्य दाखवावा, जर हे शक्य नसेल तर मोदकांचा नैवैद्यही दाखवू शकता. त्यामुळे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील.

तुमच्या आयुष्यात एखादी मोठी समस्या असेल तर ती निवारण करण्यासाठी काय कराल?

जर तुमच्या आयुष्यात एखादी मोठी समस्या असेल तर त्या समस्येचं निवारण करण्यासाठी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत गणपतीच्या मूर्तीसमोर चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसंच रोज गणेशाच्या मूर्तीला २१ दुर्वांची जुडी वाहायची आहे. तसं केल्यास या समस्यांचं निवारण होईल.

    follow whatsapp