Maharashtra weather : राज्यातील पुढील काही तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट

maharashtra weather : काही भागांत किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 10 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

हवामान स्रोतांच्या अंदाजानुसार हवामान कसं असेल?

point

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे

Maharashtra weather : भारतीय हवामान विभागाने इतर हवामान स्रोतांच्या अंदाजानुसार, 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्वसाधारणपणे कोरडं आणि स्वच्छ हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही भागांत किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 10 फेब्रुवारी रोजी राज्यातील हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बोलत नाही म्हणून नृत्यांगनेवर कोयत्याने हल्ला, रक्तरंजित घटनेने जामखेड परिसरात खळबळ

कोकण : 

कोकण विभागात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. समुद्रकिनारी दमटपणा जाणवेल, तसेच काही ठिकाणी हलका वारा अपेक्षित असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :  

पश्चिम महाराष्ट्रात सकाळी थंडावा जाणवेल, दिवसा उष्णता वाढेल, तसेच घाट माथ्यावरील भागांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

विदर्भ :  

विदर्भातील नागपुरात कमाल तापमान हे 28 अंश ते 32 अंश राहण्याची शक्यता आहे.  कोणत्याही इशाऱ्याची शक्यता नाही, तसेच 2-3 अंश सेल्सिअस वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : अर्चना पाटलांकडून पराभव होताच सक्षणा सलगर ओमराजे निंबाळकरांवर संतापल्या, काय काय म्हणाल्या? VIDEO

मराठवाडा :  

मराठवाडा विभागात कोरडं आणि सनी वातावरण राहील. फारसा तापमानात बदल घडणार नसल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

    follow whatsapp