हिंगोली : ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयात डांबून तरुणीवर अत्याचार, सहा जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर भागात नॅशनल ट्रेडींग या हळद कंपनीच्या कार्यालयात एका तरुणीला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी वासीम ख्वाजा कुरेशी या आरोपीसह सहा अन्य जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे राहणाऱ्या पीडित तरुणीला वासीम कुरेशीने ट्रेडिंग कार्यालयात […]

Mumbai Tak

मुंबई तक

27 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:07 AM)

follow google news

हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर भागात नॅशनल ट्रेडींग या हळद कंपनीच्या कार्यालयात एका तरुणीला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी वासीम ख्वाजा कुरेशी या आरोपीसह सहा अन्य जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे राहणाऱ्या पीडित तरुणीला वासीम कुरेशीने ट्रेडिंग कार्यालयात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर आई-वडीलांना मारुन टाकेन अशी धमकी देत आरोपी वासीमने पीडित तरुणीवर अत्याचार केला. यावेळी इतर साथीदारांनी पीडित तरुणीला शिवीगाळ करत मारहाणही केली.

तरुणीने स्वतःची कशीबशी सुटका केल्यानंतर घरी जाऊन आपल्या आई-वडीलांना घडलेला प्रकार सांगितलं. आई-वडीलांनी आपल्या निकटवर्तीयांच्या सहाय्याने किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य सहा जणांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान सदरचा गुन्हा कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे किल्लारी पोलिसांनी हा गुन्हा वर्ग केला असून कुरुंदा पोलीस याचा तपास करत आहेत.

    follow whatsapp