मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल; ‘हॉस्टेल’मधीलच तरुणीचं कृत्य

पंजाबमध्ये, मोहालीच्या खासगी विद्यापीठात विद्यार्थिनी अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शनिवारी सायंकाळपासून विद्यार्थिनींनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते, जे रविवारी सकाळी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर संपुष्टात आले. पंजाबच्या मोहाली इथल्या चंदीगड युनिव्हर्सिटीच्या लेडीज हॉस्टेलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. कॅम्पसमधून व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोण आरडाओरडा करतंय, कोण घोषणा देतंय कोण […]

Mumbai Tak

मुंबई तक

18 Sep 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:10 AM)

follow google news

पंजाबमध्ये, मोहालीच्या खासगी विद्यापीठात विद्यार्थिनी अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शनिवारी सायंकाळपासून विद्यार्थिनींनी कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू केले होते, जे रविवारी सकाळी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर संपुष्टात आले.

हे वाचलं का?

पंजाबच्या मोहाली इथल्या चंदीगड युनिव्हर्सिटीच्या लेडीज हॉस्टेलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. कॅम्पसमधून व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोण आरडाओरडा करतंय, कोण घोषणा देतंय कोण एका तरुणीला मारण्याच्या सुचना देतंय तर कोण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतंय. हा सगळा प्रकार नेमका काय आहे, हे जाणून घेऊयात.

चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये नेमकं काय घडलं?

चंदीगड युनिव्हर्सिटीमधल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 60 विध्यार्थीनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची बातमी कळाली आणि युनिव्हर्सिटीमध्ये एकच गोंधळ उडाला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉस्टेलमधील विद्यार्थीनींचे व्हिडीओ व्हायरल झालेत ते सगळे तिथे राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच केल्याचं तिथल्या विद्यार्थीनी आणि पोलिसांचं म्हणणं आहे. हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर काही तरुणींनी आत्महत्या केल्याच्या बातम्यादेखील समोर आल्या होत्या, मात्र याबाबत कोणत्याही तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

विद्यार्थीनीनेच काढले अंघोळ करतानाचे व्हिडिओ

एका विद्यार्थीनीने 60 विद्यार्थीनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले. ते एका तरुणाला पाठवले, संबधित तरुणाने तेच व्हिडीओ सोशल मिडीयासह इंटरनेटवर शेअर केले… इंटरनेवर येताच ज्या तरुणींचे हे व्हिडीओ होते, त्यांच्या निदर्शनास हे व्हिडीओ येताच सगळा प्रकार उघडकीस आला. ज्या विद्यार्थीनीनं व्हिडिओ पाठवले ती म्हणते की मी ज्या मुलाला व्हिडिओ पाठवले तो कोण आहे मला माहित नाही.”

तरुणीला ताब्यात तर व्हिडिओ व्हायरल करणारा गायब

सगळा गोंधळ झाल्यानंतर मोहाली पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतलंय. तर ज्या तरुणाने व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केलेत, त्याच्याही शोधात माहोली पोलीस आहेत, आता विद्यार्थिनींच्या अंघोळीचे व्हिडिओ तरुणीने का रेकॉर्ड केले, ते संबंधित तरुणाला का पाठवले, याची माहिती येणं अजून बाकी आहे मात्र या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे माहोलीसह संपूर्ण पंजाब हदरून गेलं आहे.

    follow whatsapp