Great! गुरुजींनी ३ लाख खर्चून विहिर बांधली अन् गावाची भागवली तहान

मुंबई तक

27 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:05 AM)

Guruji built a well at a cost of 3 lakhs and donate to the village : यवतमाळ : तब्बल ३ लाख रुपये खर्चून बांधलेली विहिर तहानलेल्या गावाची तहान भागविण्याचं काम एका शिक्षकांनी केलं आहे. फक्त विहिरच नाही तर विहिरीच्या सभोवतालची सुमारे अडीच हजार स्केअरफुट जागाही या शिक्षकांनी गावाला दान दिली. गावची जमीन खडकाळ असल्यानं विहिंरीना […]

Mumbaitak
follow google news

Guruji built a well at a cost of 3 lakhs and donate to the village :

हे वाचलं का?

यवतमाळ : तब्बल ३ लाख रुपये खर्चून बांधलेली विहिर तहानलेल्या गावाची तहान भागविण्याचं काम एका शिक्षकांनी केलं आहे. फक्त विहिरच नाही तर विहिरीच्या सभोवतालची सुमारे अडीच हजार स्केअरफुट जागाही या शिक्षकांनी गावाला दान दिली. गावची जमीन खडकाळ असल्यानं विहिंरीना पाणी लागत नाही. त्यामुळे नदीवरील प्रदुषित पाणी पिण्याची वेळ मागील कित्येक वर्षांपासून गावकऱ्यावर आली होती. (Guruji built a well at a cost of 3 lakhs and donate to the village)

‘सुरेश तुकाराम कस्तुरे’ असे त्या दातृत्वाचे धनी असलेल्या शिक्षकांचे नाव आहे. यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील इंझाळा येथील ते रहिवासी आहेत. ३५ वर्षांपासून ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांच्या कुटुंबात ७ एकर जमीन आहे. वडिलांच्या नावाने ३ तर त्यांच्या नावे ४ एकर शेती आहे. सुरेश यांनी नऊ महिन्यापूर्वी शेतात तीस फूट वीर खोदली. तिला भरपूर पाणी लागले. बांधकामासह तीन लाख रुपये खर्चही केला. घरी आई-वडील पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे.

महाराष्ट्राने CM म्हणून शिंदेंना स्वीकारलं?, काय आहे Mood Of the Nation

इंझाळा या गावात बाराही महिने पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यानंतर गावात जलजीवन मिशन अंतर्गत २ विहिरीचे खोदकाम करण्यात आले. परंतु खडकाळ जमिनीमुळे त्या विहिरींना पाणीचं लागलं नाही. ही समस्या शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी जाणली. दुसऱ्याच्या सुख दुखःत धावून जाणारे त्यांचे वडील तुकाराम कस्तुरे यांनी त्यांना प्रोत्साहित केले.

Mood of the Nation : भारतात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत?

याशिवाय गावातील भूदान चळवळीचे प्रवर्तक माजी खासदार भिगवंत सदाशिव ठाकरे यांची प्रेरणा घेऊन कस्तुरे यांनी ग्रामपंचायतीला आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी जागा आणि विहीर ग्रामपंचायतकडे दान म्हणून देत असल्याची कागदपत्रे सरपंच वैजंती ठाकरे आणि ग्रामसेवक अमोल जंगमवार यांच्याकडे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थित सुपूर्द केली.

    follow whatsapp