पाकिस्तानच्या ओकारा लष्करी छावणीवर भारताचा ड्रोन हल्ला

operation sindoor : भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच्या युद्धाचा आज 9 मे रोजी तिसरा दिवस आहे. या दिवशी भारतानं पाकिस्तानच्या ओकारा लष्कराच्या छावणीवर पहाटे हल्ले केलेत.

पाकिस्तानच्या ओकारा लष्करी छवणीवर भारताचा ड्रोन हल्ला

पाकिस्तानच्या ओकारा लष्करी छवणीवर भारताचा ड्रोन हल्ला

मुंबई तक

• 02:45 PM • 09 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच्या युद्धाचा आज 9 मे रोजी तिसरा दिवस आहे.

point

भारतानं पाकिस्तानच्या ओकारा लष्कराच्या छावणीवर पहाटे हल्ले केलेत.

point

हल्ल्याबाबत 'आज तक'नं पुष्टी केलीय.

operation Sindoor : भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच्या युद्धाचा आज 9 मे रोजी तिसरा दिवस आहे. अशातच भारतानं पाकिस्तानच्या ओकारा लष्कराच्या छावणीवर पहाटे हल्ले केलेत. ज्याची पुष्टी करण्यात आली आहे. दरम्यान, अशातच पाकिस्तानात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. यामुळे परिस्थिती बिघडली आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्यानं पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हल्ले हाणून पाडलेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जम्मू काश्मीरवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा!

जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवादी ठार

8 मे रोजी रात्री, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर भारतानं जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांना ठार केलं. पाकिस्तानकडून भारतात घुसखोरी करत हल्ल्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, भारतानं हे हल्ले परतवून लावले आहेत. अशावेळी जम्मू आणि काश्मीरवरील हल्ल्यात सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचं सांगण्यात येतंय. 

भारतीय सेनेनं सांगितलं की, 8 आणि 9 मे च्या रात्री पाकिस्तानी लष्करांनी पश्चिमी सीमांवर हल्ले सुरूच ठेवलेत. यावेळी पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत सीमांवरील भागांना लक्ष्य करण्यात आलंय. यासोबत त्यांनी अनेकदा जम्मू-काश्मीरवर हल्ला करत शस्त्रांचं उल्लंघन केल्याचं सांगण्यात येतंय. 

भारताचं ऑपरेशन सिंदूरबाबत चोख उत्तर

भारतानं ऑपरेशन सिंदूरबाबत ड्रोन हल्ल्याला यशस्वीरित्या चोखपणे उत्तर दिलंय. सैन्यांनी स्पष्टीकरण दिलं की, भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी आवश्यक पाऊलं उचलले जावेत. कोणताही वाईट मनसूबे खपवून घेतले जाणार नाहीत.

हेही वाचा : भारतासमोर तोंडावर आपटलेल्या पाकिस्तानने आता कर्जासाठी हात पसरले, समोर आले स्पष्ट पुरावे

सांगण्यात येतंय की, दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आता बिथरून गेलाय. गुरूवारी जम्मूपासून काश्मीरपर्यंत जैसलमेरपर्यंत भारताच्या एकूण 15 शहरांना लक्ष्य करण्यात आलंय. भारतीय सैन्यांनी हे सर्व हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय. 

    follow whatsapp