Sindoor operation : भारताचं ऑपरेशन सिंदूर जारीच आहे. युद्धाचा आज तिसरा दिवस असून भारतानं पाकिस्तानची पळताभुई थोडी केलीय. भारतानं सुरूवातीला दहशतवाद्यांचे अड्डे उडवले. मात्र, त्यानंतर पाकिस्ताननं भारताच्या लष्करांवर हल्ला करत मोठी चूक केलीय. या प्रत्युत्तरात भारताला पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम उडवण्यात यश आलंय. हे युद्ध गेली तीन दिवस सुरूच आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हेंस यांनी स्पष्टीकरण दिलंय. आम्ही यात काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. हे आमचं काम नसून आम्ही केवळ चर्चेतून मार्ग काढू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : देशभरात 26 विमानतळं बंद, दिल्लीतील 90 उड्डाणं रद्द... पुन्हा कधी सुरू होणार?
काय म्हणाले जेडी व्हेंस?
एका मुलाखतीदरम्यान, अमेरिकेचे जे.डी. व्हेंस यांनी भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य केलंय. ते म्हणाले की, दोन्ही देशातील सुरू असणारं युद्ध कमी व्हावं असं आम्हाला वाटतं. पण आम्ही या युद्धाला अटोक्यात आणू शकत नसल्याचं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्याशस्त्र हल्ल्याबाबत अमेरिका भाष्य करू शकत नाही. या युद्धजन्य परिस्थितीत चर्चा करून यावर मार्ग काढता येईल. आशा आहे की, हे युद्ध आणखी चिघळलं जाऊ नये, असं जे.डी. व्हेंस म्हणाले आहेत.
हेही वाचा : आकाश, MRSAM ते शिल्का... पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर, भारताची ढाल ठरलेत हे 5 एअर डिफेन्स शस्त्र
दरम्यान, याआधी पाकिस्तानचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत जर काही मदत करायची असल्यास नक्कीच करू. त्यांनी सध्या सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती अगदी भयावह असल्याचं सांगितलंय. दोन्ही देशांनी मिळून चर्चा करून यातून मार्ग काढावा.
दरम्यान, आज 9 मे च्या मध्यरात्रीपासून पाकिस्तानचा जम्मूवर गोळीबार सुरू आहे. तर अनेक हवाई हल्ले देखील केल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, पाकिस्तानच्या या हल्ल्यावर भारतानं प्रतिहल्ला करत क्षेपणास्त्र हाणून पाडली आहेत.
ADVERTISEMENT
