आधी रस्त्याने, नंतर विशेष रेल्वेने... पंजाब आणि दिल्लीच्या खेळाडूंना कोणत्या सुरक्षित ठिकाणी पाठवलं?

पाकिस्तानी सैन्याने काल पठाणकोटसह अनेक मोठ्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यानंतर IPL ने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

09 May 2025 (अपडेटेड: 09 May 2025, 12:49 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्टेडियमवर फ्लडलाईट बंद पडल्याचं कारण देत सामना रद्द

point

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची माहिती

धर्मशाला : IPL 2025 चा पंजाब किंग्स (PBKS) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यातील सामना काल रद्द करण्यात आला. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला स्टेडियमवर फ्लडलाईट बंद पडल्याचं कारण देत सामना रद्द करण्यात आला. मात्र, दुसरीकडे भारत-पाक सिमेवर तणाव वाढला आणि परिसरातील परिस्थितीमुळे मध्येच रद्द करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> देशभरात 26 विमानतळं बंद, दिल्लीतील 90 उड्डाणं रद्द... पुन्हा कधी सुरू होणार?

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव आणि जम्मू तसंच पठाणकोटवर हवाई हल्ल्याच्या प्रयत्नांमुळे हा सामना स्थगित करण्यात आला अशीही माहिती आहे. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांना आता विशेष वंदे भारत ट्रेनने पठाणकोटमार्गे दिल्लीला पाठवण्यात आलं आहे.

रस्ते मार्गाने पठाणकोटला, पुढे रेल्वेने दिल्लीत

आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाल यांनी पीटीआयला सांगितलं की, दोन्ही संघांचे खेळाडू आणि कर्मचारी धर्मशालामधून 85 किलोमीटर अंतरावरील पठाणकोटला रस्तेमार्गे पोहोचतील आणि तिथून विशेष ट्रेनने दिल्लीला रवाना होतील. भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हालचालींमुळे धर्मशाला, कांग्रा आणि चंदीगडमधील विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> आकाश, MRSAM ते शिल्का... पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर, भारताची ढाल ठरलेत हे 5 एअर डिफेन्स शस्त्र

एएनआयच्या वृत्तानुसार, खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि प्रसारकांसह सुमारे 300 जण विशेष वंदे भारत ट्रेनने दिल्लीला प्रवास करत आहेत. कडेकोट सुरक्षेत त्यांना दिल्लीला हलवण्यात आलंय. दिल्लीत या खेळाडुंना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलंय. 

परदेशी खेळाडू भारत सोडणार? 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024)  मधील अनेक परदेशी खेळाडू लवकरात लवकर मायदेशी परतण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. "सूत्रांनी उघड केलंय की, परदेशी खेळाडू लवकरात लवकर मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त करत आहेत" असं वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

    follow whatsapp