कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, खबरदारीमुळे भाविकांचं दर्शन काहीकाळ थांबवलं

मुंबई तक

• 01:05 PM • 07 Oct 2021

आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. घटस्थापनेच्या आजच्या मुहुर्ताच्या निमीत्ताने राज्य सरकारने मंदिरंही भाविकांसाठी खुली केली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असताना पोलिसांना मंदिर परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक निनावी फोन आला. या फोननंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ भाविकांसाठीचं दर्शन थांबवलं. याचसोबत बॉम्बशोधक पथकाला तात्काळ पाचारण करत पोलिसांनी […]

Mumbaitak
follow google news

आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. घटस्थापनेच्या आजच्या मुहुर्ताच्या निमीत्ताने राज्य सरकारने मंदिरंही भाविकांसाठी खुली केली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असताना पोलिसांना मंदिर परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक निनावी फोन आला.

हे वाचलं का?

या फोननंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ भाविकांसाठीचं दर्शन थांबवलं. याचसोबत बॉम्बशोधक पथकाला तात्काळ पाचारण करत पोलिसांनी संपूर्ण मंदिर परिसराची कसून तपासणी केली. यावेळी उपस्थित भाविकांनाही मंदिराबाहेर काढण्यात आलं.

परंतू संपूर्ण मंदिराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कोणताही बॉम्ह सापडला नाही. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कसून चौकशी केली. कोल्हापूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला हा फोन पणजी येऊन आल्याचं कळतंय. त्यामुळे हा फोन करणारा व्यक्ती नेमका कोण आहे याचा तपास आता सुरु झाला आहे.

    follow whatsapp