Photos: ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये होणार IAS टीना दाबीचं रिसेप्शन, एक दिवसाचं भाडं किती?

मुंबई तक

• 02:50 PM • 30 Mar 2022

जयपूर: IAS टीना डाबी (Tina dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. टीना आणि प्रदीप यांचे लग्न 20 एप्रिल 2022 रोजी होणार आहे आणि लग्नाचे रिसेप्शन 22 एप्रिलला होणार आहे. जयपूरमधील एका आलिशान […]

Mumbaitak
follow google news

जयपूर: IAS टीना डाबी (Tina dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. टीना आणि प्रदीप यांचे लग्न 20 एप्रिल 2022 रोजी होणार आहे आणि लग्नाचे रिसेप्शन 22 एप्रिलला होणार आहे. जयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. या लक्झरी हॉटेलमध्ये काय खास आहे? आत कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? आणि एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे किती आहे? जाणून घ्या या सगळ्याबाबत सविस्तरपणे.

हे वाचलं का?

कोणत्या हॉटेलमध्ये होणार लग्न?

IAS टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नाचे रिसेप्शन जयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नपत्रिकेनुसार रिसेप्शन ‘हॉटेल हॉलिडे इन’ (Hotel Holiday INN, Jaipur)येथे होणार आहे. हॉटेलच्या अधिकृत वेबसाइट ihg नुसार, हे हॉटेल जयपूरच्या रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. हॉटेल हवा महल, जंतर मंतर, अंबर फोर्ट, नाहरगड किल्ला, सिटी पॅलेस, जलमहाल आणि अल्बर्ट हॉल यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या देखील हे हॉटेल जवळ आहे.हॉटेलमध्ये ‘या’ लक्झरी सुविधा उपलब्ध

हॉटेलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, येथे येणाऱ्या लोकांना अनेक लक्झरी सुविधा मिळतात. या हॉटेलमधील नैसर्गिक हिरवाईमुळे खूप छान वाटते. यामध्ये मोफत इंटरनेट, इनडोअर पूल स्लाइड, आउटडोअर पूल, कॉकटेल लाउंज, स्पा, फिटनेस सेंटर, लक्झरी बुफे, मीटिंग एरिया, योग, फॉरेन करंसी एक्सचेंज, स्टोरेज स्पेस, सेफ्टी बॉक्स डिपॉझिट, मेडिकल इमर्जन्सी अशा सुविधाही आहेत.

मुलांना खेळण्यासाठी येथे खूप चांगले वातावरण आहे. 12 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाची मुले त्यांच्या पालकांसोबत विनामूल्य राहू शकतात. म्हणजेच त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. तसेच 12 वर्षाखालील कमी वयाची 4 मुले हे दिवसाच्या कोणत्याही वेळी हॉलिडे इन ऑन-साइट रेस्टॉरंटमध्ये विनामूल्य जेवण करू शकतात.

हॉटेलमध्ये ‘या’ लक्झरी सुविधा उपलब्ध

राहण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध

वेबसाइटनुसार, हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेस्ट रुम आणि सुइट बुक करू शकतात. पाहा दोघांमध्ये नेमकी काय वैशिष्ट्य आहेत.

गेस्ट रुम (Guest Rooms)

गेस्ट रुममध्ये मोफत वाय-फाय, मीडिया हब, ई-सेफ, मोफत इन-रूम चहा आणि कॉफी, मोफत मिनरल वॉटर, 32 एलईडी टीव्ही, हेअर ड्रायर, इन-रूम मिनी बार, फंक्शन शॉवर, सॉफ्ट आणि फर्म उशा, शूजची मोफत स्वच्छता, डेंटल आणि शेव्हिंग किट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

सुइट (Suite)

एक्झिक्युटिव्ह सूइटमध्ये एक्झिक्युटिव्ह लाउंज, मोफत वाय-फाय, लॉन्ड्री, वनवे एअरपोर्ट ट्रान्सफर, बिझनेस सेंटर बोर्ड रूमचा 2-तास मोफत वापर, वेट मशीन, इन-रूम मिनी बार, मल्टी-फंक्शन शॉवर अशा अनेक गोष्टी यामध्ये मिळतात.

जेव्हा आम्ही वेबसाइटवरून रूम बुक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका सूइटसाठी एका रात्रीचे भाडे 11,640 रुपये होते. सिंगल बेड असलेल्या रूमचे भाडे 6,305-6,790 रुपये होते. तर डबल बेड असलेल्या रूमचे भाडे 6,305-6,790 रुपये होते. ही या रुमची बेसिक प्राइज आहे. यामध्ये डिनर, एक्स्ट्रा बेड, ब्रेकफास्ट आणि फॅमिली रूमचे चार्जेस वेगळे असतील.

पाहा याच हॉटेलचे आणखी काही फोटो

    follow whatsapp