हरनाज कौर संधू ठरली ‘मिस युनिव्हर्स’! 21 वर्षानंतर भारताला मिळालं विजेतेपद

मुंबई तक

• 05:51 AM • 13 Dec 2021

भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगाला भुरळ घातली. जागतिक पटलावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारली आहे. हरनाजने मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून, तब्बल 21 वर्षानंतर भारताला हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी लारा दत्ताने 2000 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजेता ठरली होती. ‘मिस युनिव्हर्स 2021’च्या स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा […]

MumbaiTak
Google CTA

भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगाला भुरळ घातली. जागतिक पटलावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारली आहे. हरनाजने मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून, तब्बल 21 वर्षानंतर भारताला हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी लारा दत्ताने 2000 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजेता ठरली होती.

हे वाचलं का?

‘मिस युनिव्हर्स 2021’च्या स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारत 70वी मिस युनिव्हर्स होण्याचा किताब पटकावला आहे. भारताला 21 वर्षानंतर मिस युनिव्हर्सचं विजेतपद मिळालं आहे.

इस्रायलमधील एलियटमध्ये 70वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताच्या हरनाज कौरने पहिलं क्रमांक पटकावतं विजेतेपदावर नावं कोरलं. भारताला आतापर्यंत तीन वेळा मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला असून, शेवटचा किताब अभिनेत्री लारा दत्ताने 2000 मध्ये पटकावला होता.

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताची हरनाज कौर संधूने पहिला क्रमांक पटकावला, तर दुसऱ्या स्थानी मिस पराग्वे दुसऱ्या स्थानावर राहिली. मिस आफ्रिका स्पर्धेची विजेतीला तिसरं स्थान मिळालं.

हरनाज कौर संधू चंदीगडची रहिवाशी आहे. शिख कुटु्बांत हरनाजचा जन्म झाला असून, तिला फिटनेस आणि योगा करण्याची आवड आहे. 2017 मध्ये हरनाजने मिस चंदीगड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तिची सौंदर्य स्पर्धेतील घौडदौड सुरू झाली.

‘मिस चंदीगड’नंतर 2018 मध्ये हरनाजने ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया’ विजेतेपद पटकावलं होतं. दोन स्पर्धांमध्ये विजेता ठरल्यानंतर हरनाजने 2019 मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. मिस इंडिया स्पर्धेत ती 12व्या स्थानी राहिली होती.