अंबानींच्या घराबाहेरील गाडीप्रकरणी ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी

मुंबई तक

• 04:42 AM • 28 Feb 2021

मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन कांड्याने भरलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. या गाडीबाबत जैश-उल-हिंद या नावाच्या एका संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ही जबाबदारी स्वीकारली आहे. काही दिवासांपूर्वी याच संघटनेने राजधानी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. याच संघटनेकडून बिटकॉईनच्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन कांड्याने भरलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. या गाडीबाबत जैश-उल-हिंद या नावाच्या एका संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ही जबाबदारी स्वीकारली आहे. काही दिवासांपूर्वी याच संघटनेने राजधानी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. याच संघटनेकडून बिटकॉईनच्या माध्यमातून पैशाची मागणी देखील केली गेली होती.

हे वाचलं का?

तपास यंत्रणांना दिलंय आव्हान

दरम्यान, या संघटनेने एका मेसेजच्या माध्यमातून तपास यंत्रणांना आव्हान दिलं आहे की, ‘थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा… तुम्ही तेव्हा देखील काहीही करु शकला नव्हता जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखालून दिल्लीत तुम्हाला ‘हिट’ केलं होतं. तुम्ही मोसादसोबत हातमिळवणी केली पण काहीही झालं नाही. तुम्ही लोकं वाईट पद्धतीने अपयशी ठरला आहात आणि पुढे देखील तुम्हाला यश मिळणार नाही.’ याच मेसेजमध्ये पुढे असं लिहलं आहे की, (अम्बानिज साठी) ‘तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा, जे तुम्हाला आधी सांगितलं होतं.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानबाहेर एक संशयित कार आढळून आली होती. ज्यामध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या आणि एक धमकीचं पत्र देखील होतं. यामध्ये मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास अँटेलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. त्यावेळी इथे आणखी एक इनोव्हा गाडी देखील दिसली होती. एका व्यक्तीने स्कॉर्पिओ कार पार्क केल्यानंतर तो नंतर दुसऱ्या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेला होता. अँटेलियाबाहेर संशयित कार दिसल्यानंतर येथील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली होती. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जैश-उल-हिंदने घेतली होती जबाबदारी

29 जानेवारीला संध्याकाळी दिल्लीमधील इस्त्रायली दूतावासाजवळ एक बॉम्बस्फोट झाला होता यामध्ये जवळजवळ 5 ते 6 गाड्यांचे नुकसान देखील झाले होते. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. हा स्फोट तेव्हाच झाला होता जेव्हा काही अतंरावर बीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम सुरु होता आणि तिथे देशातील अनेक बडे व्हीआयपी उपस्थित होते. या घटनेची जबाबदारी देखील जैश-उल-हिंद या संघटनेनेच घेतली होती. या संघटनेने दावा केला होता की, त्यांनीच इस्त्रायली दूतावासाच्या समोर बॉम्बस्फोट घडवून आणला. गुप्तचर यंत्रणांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर एक चॅट सापडलं होतं ज्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता.

    follow whatsapp