अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादात, शरद पवारांबद्दल फेसबुकवर टाकली पोस्ट

मुंबई तक

• 07:30 AM • 14 May 2022

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं यावेळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. आक्षेपार्ह […]

Mumbai Tak
Google CTA

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हे वाचलं का?

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं यावेळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. आक्षेपार्ह भाषेत असलेल्या या पोस्टवरून आता केतकी चितळेवर टीका होऊ लागली आहे.

केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

केतकीने पोस्ट केलेली पोस्ट

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)

पोस्टची पार्श्वभूमी काय?

मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती.

या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.

यापूर्वीही सापडली होती वादात…

केतकी चितळे अशा स्वरुपाच्या पोस्टमुळे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ती अशाच पोस्टमुळे वादात अडकलेली आहे. १ मार्च २०२० रोजी चितळेने एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये ती म्हणाली होती, ‘नव बौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू हा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी? पण, अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके व्यग्र आहोत. आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात. आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,’ असं केतकी म्हणाली होती.