ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा मान किंग चार्ल्स थ्री यांना मिळाला आहे. लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. किंग चार्ल्स थ्री यांच्या रूपाने आता ब्रिटनला नवा सम्राट मिळाला आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किंग चार्ल्स ३ यांना ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. किंग चार्ल्स यांनी ब्रिटनचे सम्राट होण्याची औपचारिकता संपवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये सोहळा
लंडनच्या सेंट जेम्स पॅलेसमध्ये किंग चार्ल्स ३ यांचा राज्याभिषेक झाला. किंग चार्ल्स ३ यांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असेलल्या लोकांनी राज्याभिषेक झाल्यानंतर चार्ल्स यांना अभिवादन केलं. महाराणी एलिझाबेथ यांनी ७० वर्षे महाराणी म्हणून कारकीर्द गाजवली. त्यानंतर आता ब्रिटनच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये काही नवे बदल होणार आहेत.
सात दशकांचा गौरवशाली प्रवास इतिहासजमा, कशी होती क्वीन एलिझाबेथ यांची कारकीर्द?
किंग चार्ल्स सम्राट झाल्याने ब्रिटनमध्ये काय बदल होणार?
ब्रिटनचं राष्ट्रगीत बदललं जाणार तसंच प्रिन्स ऑफ्स वेल्सही बदलले जाणार
किंग चार्ल्स ३ हे राजकीय बाबतींमध्ये त्यांचं कुठलही मत व्यक्त करू शकणार नाहीत
ब्रिटनचे नवे सम्राट किंग चार्ल्स ३ यांना आता व्होटर कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याची गरज उरणार नाही.
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स ऑफ वेल्स असलेले चार्ल्स थ्री यांनाच पुढचे सम्राट केलं जाणार होतं. त्यानुसार त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आहे. राज्याभिषेक सोहळ्याला ब्रिटनच्या पंतप्रधान लिज ट्रस आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेदेखील उपस्थित होते. प्रिन्स चार्ल्स ३ हे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे मोठे पुत्र आहेत. महाराणी एलिझाबेथ यांचं बुधवारी निधन झालं. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आता किंग चार्ल्स हे ब्रिटनचे सम्राट झाले आहेत.
कोहिनूर हिरा असलेला राजमुकुट कुणाला मिळणार?
२०२२ च्या सुरूवातीलाच महाराणी एलिझाबेथ यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. प्रिन्स चार्ल्स हे जेव्हा ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान होतील तेव्हा त्यांच्या पत्नीला म्हणजेच कॅमिला यांना हा कोहिनूर हिरा असलेला मुकुट मिळेल असा आदेश महाराणी एलिझाबेथ यांनी काढला होता.१०५.६ कॅरेटाचा कोहिनूर हिरा हा भारतातला प्राचीन हिरा म्हणून ओळखला जातो. १४ व्या शतकात हा हिरा भारतात होता. त्यानंतर शतकानुशतकं या हिऱ्याचे मालक बदलत गेले. सध्या हा हिरा ब्रिटनच्या राजघराण्यातील मुकुटात आहे.
ADVERTISEMENT
