Ganesh Utsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी असे बनवा खव्याचे मोदक, खाणारेही म्हणतील वा वा!

मुंबई तक

• 02:30 AM • 26 Aug 2022

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळं तयारी करत आहेतच. तसंच घरगुती स्वरूपातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचं सावट होतं ते दूर होऊन यंदा दणक्यात उत्सव साजरा केला जाणार आहे. अनेक घरांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा […]

Mumbaitak
follow google news

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळं तयारी करत आहेतच. तसंच घरगुती स्वरूपातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचं सावट होतं ते दूर होऊन यंदा दणक्यात उत्सव साजरा केला जाणार आहे. अनेक घरांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस गणपती बसवला जातो. अशावेळी लाडक्या बाप्पाला काय नैविद्य दाखवयाचा हा प्रश्न असतोच.

हे वाचलं का?

आज आम्ही तुमची ही समस्या दूर करणार आहोत. लाडक्या बाप्पाला तुम्ही खव्याच्या मोदकांचा नैविद्य दाखवू शकता. त्याचीच कृती आम्ही तुम्हाला आमच्या या बातमीमधून सांगणार आहोत.

खव्याच्या मोदकासाठी काय साहित्य लागेल?

खवा ५०० ग्रॅम

साखर साधारण पाव किलो

वेलची पावडर-२ छोटे चमचे

केशर-अगदी चिमूटभर

खव्याचा मोदक कसा तयार कराल?

खवा साधारण ५०० ग्रॅम घ्या. हा खवा तूप टाकून नॉनस्टिक पॅनमध्ये छान भाजा. त्यात भाजत असतानाच साखर घाला. ही साखर साधारण खवा पातळ होणार नाही या अंदाजाने घालायची आहे. खवा आणि साखर यांचं मिश्रण खमंग भाजून झालं की आणि साखर खव्यात विरघळी की त्या मिश्रणात थोडं केशर घाला. त्यानंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत वाफ येऊ द्या. मिश्रणाला वाफ आली की त्यात सुगंध येण्यासाठी वेलची पावडर टाका आणि ती छान मिसळून घ्या. मिश्रण फार थंड होऊ न देता ते मोदकाच्या आकारात वळा. जसे लाडू वळले जातात अगदी तसेच पण आकार मोदकांचा द्या. झाले तुमचे चविष्ट आणि खमंग मोदक तयार. या मोदकांचा आकार तुमच्या इच्छेप्रमाणे ठरवू शकता.

गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सगळ्यांनी यंदा केली आहे. घराघरांमध्ये मोदकांचा प्रसाद वाटला जातो. कुणी तळलेले मोदक किंवा उकडीचे मोदकही तयार करतात. अशात खव्याच्या मोदकांची ही वेगळी रेसेपी ट्राय करून बघायला हरकत नाही. तुम्हीही खुश आणि तुमच्या हातचे मोदक खाणारा खवय्याही खुश. मग वाट कसली बघताय? या गणपतीत नक्की तयार करून पाहा खव्याचे मोदक.

    follow whatsapp