Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा! 'या' ठिकाणी सूर्य आग ओकणार, तुमच्या जिल्ह्यात कसं असेल तापमान?

मुंबई तक

07 Mar 2025 (अपडेटेड: 07 Mar 2025, 12:13 PM)

Maharashtra Weather Today :राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कमाल तापमाना वाढलं असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे.

Maharashtra Weather Update Today

Maharashtra Weather Update Today

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उकाडा वाढणार?

point

या जिल्ह्यात असणार उष्ण आणि दमट हवामान

point

राज्यातील हवामानाची माहिती जाणून घ्या सविस्तरपणे

Maharashtra Weather Update: राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कमाल तापमाना वाढलं असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरली आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने लोकांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत आहेत. आजपासून येत्या काही दिवसात उकाडा वाढणार असल्याने लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. तसच रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरणाची स्थिती असणार आहे.

हे ही वाचा >> Pune: काकूसोबत अनैतिक संबंध, पण अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा अँगल का आला मधे?

दरम्यान पालघर जिल्ह्यात कोरडे हवामान असण्याची शक्यता आहे. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव, अकोला, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात कोरडं हवामान असण्याची दाट शक्यता आहे. 

हे ही वाचा >> Marathi Population in Mumbai: मुंबईत किती मराठी आणि किती गुजराती? ही आकडेवारी पाहून तुम्हीही...

काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36°C आणि 19°C च्या आसपास नोंदवण्यात आला होता..तर राजधानी दिल्लीत किमान तापमान 13°C  आणि कमाल तापमान 29°, तर मुंबईत कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.