आज बाळासाहेब असते, तर… ; क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री ठाकरेंना भावनिक पत्र

मुंबई तक

• 07:06 AM • 28 Oct 2021

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर विविध केले जात असून, त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरही आरोपांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. नवाब मलिकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांवरून क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर विविध केले जात असून, त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दलही शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरही आरोपांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. नवाब मलिकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांवरून क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.

हे वाचलं का?

क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र

माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच घडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे.. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..

मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा कहिही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रू ची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे..

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्हीं आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्हीं योग्य तो न्याय करा अशी विनंती.

आपली बहिण, क्रांती रेडकर.

    follow whatsapp