हिंगोलीमध्ये लव जिहाद? लग्नाचं अमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव; एकावर गुन्हा दाखल

हिंगोली : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली. श्रद्धाने आपला प्रियकर आफताब पूनावालासाठी वडिलाचं घर सोडलं. लग्न न करताच आफताबसोबत ती लिव्ह इन मध्ये राहू लागली. आई-वडिलांनी समजावलं पण श्रद्धाने कुणाचंच ऐकलं नाही. याच श्रद्धाचा अत्यंत वाईट पद्धतीने खून झाला आहे. तिची हत्या केल्यानंतर आफताबनेच तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. यानंतर या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:59 PM • 19 Nov 2022

follow google news

हिंगोली : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली. श्रद्धाने आपला प्रियकर आफताब पूनावालासाठी वडिलाचं घर सोडलं. लग्न न करताच आफताबसोबत ती लिव्ह इन मध्ये राहू लागली. आई-वडिलांनी समजावलं पण श्रद्धाने कुणाचंच ऐकलं नाही. याच श्रद्धाचा अत्यंत वाईट पद्धतीने खून झाला आहे. तिची हत्या केल्यानंतर आफताबनेच तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. यानंतर या प्रकरणात लव जिहादचा आरोप होऊ लागला.

हे वाचलं का?

हा आरोप ताजा असतानाच आता हिंगोलीमध्ये लग्नाचं अमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून साजीद रफीकखाँ पठाण याच्यावर गुन्हा दाखल झाला असून बाळापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेण्यात आलं. त्यानंतर तिला कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, जवळा बाजार,औरंगाबाद आणि दिल्ली येथील फरीदाबाद येथे नेऊन तिची संमती नसतांना तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले.

मात्र काही दिवसांतच धर्मांतरासाठी दबाव आणून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून साजीद रफीकखाँ पठाण रा. जवळा पांचाळ, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली याच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा 376 (2) नुसार बलात्कार, N 506 आणि अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp