Solapur Muncipal Corporation : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाची पहिली यादी समोर आली आहे. या यादीत राष्ट्रवादीने तब्बल 20 जागा मिळवल्याचे वृत्त समोर आले आहे. या पहिल्या यादीत 6 उमेदवारांची देखील घोषणा केली आहे. या सहाजणांपैकी इतर पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे सोलापूरात काँग्रेसचा एका उमेदवाराने सोडचिठ्ठी देऊन एमआयएम पक्षप्रवेश केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'आई कुठे काय करते'? मालिकेतील अभिनेत्रीच्या सूनेचं कांड आलं समोर, तब्बल दीड कोटींची खंडणी
सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 6 उमेदवारांच्या नावांची यादी समोर
सोलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उमेदवार मोहम्मद नकीब हासीब कुरेश यांना प्रभाग क्र. 8 अ मधून संधी देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. 17 क मधून बिस्मिल्ला शिकलकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रभाग क्र. 23 अ मधून सुनिता दादाराव रोटे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच 26 अ मझून नागिणी प्रवीण इरकशेट्टी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर प्रभाग क्र. 18 मधून अंबादास सोमण्णा नडगीरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूरात काँग्रेसचा उमेदवार एमआयएमच्या गळाला
तर दुसरीकडे काँग्रेसला सोलापूरात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा एक शिलेदार हा महापालिका निवडणुकीपूर्वी एमआयएम या पक्षात गेला आहे. संबंधित काँग्रेसचा उमेदवार हा सोलापूर महापालिका प्रभाग क्र. 16 मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असलेल्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये पक्षप्रवेश केला होता.
हे ही वाचा : मुंबईत महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित आघाडीनं युतीची घोषणा केली, कोण किती जागा लढणार? आकडा समोर
काँग्रेसच्या नेत्यानं घेतलेल्या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. या प्रकरणात फिरदोस पटेल यांनी आरोप केला की, त्या एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या नातेवाईक असून, शौकत पठाण यांच्या मध्यस्थीने त्यांनी एमआयएममध्ये पक्षप्रवेश केला.
ADVERTISEMENT











