माधुरी दीक्षित दिवाळीत करणार नव्या घरात प्रवेश, घरभाडे ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिची लाईफस्टाईल ही जबरदस्त आहे. तिने नुकताच एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला आहे. त्याचे भाडे ऐकून कुणीही थक्क होईल. नुकताच हा व्यवहार पूर्ण झाला आहे. माधुरी दीक्षितने आता IndiaBulls Blu मध्ये असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट पुढील तीन वर्षांसाठी घेतला आहे. काय आहे माधुरीच्या नव्या फ्लॅटची खासियत? वरळीच्या IndiaBulls Blu मध्ये 29 व्या मजल्यावर […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:51 AM • 03 Nov 2021

follow google news

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिची लाईफस्टाईल ही जबरदस्त आहे. तिने नुकताच एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला आहे. त्याचे भाडे ऐकून कुणीही थक्क होईल. नुकताच हा व्यवहार पूर्ण झाला आहे. माधुरी दीक्षितने आता IndiaBulls Blu मध्ये असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट पुढील तीन वर्षांसाठी घेतला आहे.

हे वाचलं का?

काय आहे माधुरीच्या नव्या फ्लॅटची खासियत?

वरळीच्या IndiaBulls Blu मध्ये 29 व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. हा फ्लॅट 5500 स्क्वेअर फुटांचा आहे. या आलिशान फ्लॅटमध्ये प्रशस्त खोल्या, बाल्कनी आहेत. यासंबंधीचा भाडेकरार 26 ऑक्टोबरला पूर्ण झाला आहे. Zapkey.com ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

काय आहे माधुरीच्या घराचं घरभाडं?

इंडियाबुल्स ब्लू मध्ये असलेल्या फ्लॅटसाठी माधुरी दीक्षितने 3 कोटी रूपये डिपॉझिट भरलं आहे. तसंच महिन्याला घर भाडं म्हणून 12 लाख 50 हजार रूपये भरावे लागणार आहेत. या फ्लॅटचं महिन्याचं जितकं घरभाडं आहे ती रक्कम एखाद्या सामान्य कुटुंबाला परवडणाऱ्या फ्लॅटच्या डाऊनपेमेंटची रक्कम असू शकते. पुढील तीन वर्षांसाठी माधुरीने हा आलिशान फ्लॅट रेंटवर घेतला आहे. माधुरी दीक्षित घरभाडं म्हणून जी रक्कम देणार आहे त्यामध्ये दरवर्षी पाच टक्के भाडेवाढही होणार आहे. माधुरीने ज्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट रेंटने घेतला आहे तिथे सगळे आलिशान फ्लॅट आहेत . या ठिकाणी जे फ्लॅट आहेत त्यांची किंमत प्रति स्क्वेअर फूट 70 हजार रूपये आहे. या इमारतीत असणारे सगळे फ्लॅट हे 5 हजार स्क्वेअर फूट आणि 6 हजार स्क्वेअर फूट असे किंवा त्यामधल्या क्षेत्रफळाचेच आहेत.

माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस महाराष्ट्रीयन लूक

Work Front वर काय करते आहे माधुरी?

वर्क फ्रंट बद्दल बोललं तर माधुरी दीक्षित सध्या मोठ्या पडद्यावर दिसत नाही. मात्र छोट्या पडद्यावर माधुरी काम करताना दिसते आहे. रिअॅलिटी शोसाठी ती जज म्हणून काम करते आहे. तसंच आपल्या मुलासोबत ती क्लासिकल डान्सची प्रॅक्टिसही करते आहे. माधुरी दीक्षितने हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. 90 च्या दशकात तिने अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तेजाब, अंजाम, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है या आणि अशा अनेक चित्रपटात माधुरीने काम केलं आहे. त्यानंतर ती श्रीराम नेनेंसोबत विवाहबद्ध झाली आणि अमेरिकेला शिफ्ट झाली. त्यानंतर तिने ‘आजा नच ले’ या सिनेमातून तिने कमबॅक केलं होतं. डेढ इश्किया या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं.

    follow whatsapp