महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली असून…सध्या आपल्या तब्येत व्यवस्थित असून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहन टोपे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत पुन्हा चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावली होती. महाराष्ट्रात अकोला, अमरावती आणि यवतमाळ अशा ३ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे.
याव्यतिरीक्त मुंबईतही गेल्याकाही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने निर्बंध पुन्हा एकदा कडक केले असून होम क्वारंटाइनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याचसोबत क्वारंटाइन असलेल्या लोकांच्या हातावर आता शिक्केही मारले जाणार आहेत. महापालिकेच्या नवीन नियमांनुसार एका सोसायटीत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सिल करण्यात येणार आहे. लग्न व इतर सोहळ्यांनाही फक्त ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांनाही मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय.
ADVERTISEMENT











