Maharashtra HSC Result 2021:’MSBSHSE’ बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर, mahresult.nic.in वर मार्कशीट

मुंबई तक

• 10:38 AM • 03 Aug 2021

Maharashtra HSC Result 2021/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2021 निकाल (Maharashtra HSC result 2021) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता बोर्डाने संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला. यंदा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. बारावीचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. […]

Mumbaitak
follow google news

Maharashtra HSC Result 2021/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2021 निकाल (Maharashtra HSC result 2021) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता बोर्डाने संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला. यंदा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे.

हे वाचलं का?

बारावीचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल आहे.

2021 शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result)

कला (Arts) – 99.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते

वाणिज्य (Commerce) – 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले

विज्ञान (Science) – 99.45 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 98.80 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते

कोरोना संकटामुळे यंदा बारावीची परीक्षा घेण्यात आली नव्हती. अगदी शेवटच्या क्षणी सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन या पद्धतीनुसार लावण्याचा निर्णय झाला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यात बारावीचा निकाल लागला.

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

  • mahresult.nic.in

  • maharashtraeducation.com

  • results.mkcl.org

HSC Result 2021: पाहा विभागानुसार निकाल

  • पुणे – 99.75

  • नागपूर – 99.62

  • औरंगाबाद – 99.34

  • मुंबई – 99.79

  • कोल्हापूर – 99.67

  • अमरावती – 99.37

  • नाशिक – 99.61

  • लातूर – 99.65

  • कोकण – 99.81

Maharashtra HSC Result 2021: 12वीचा निकाल ‘इथे’ पाहा, mahresult.nic.in वरुन करा मार्कशीट डाऊनलोड

महाराष्ट्र बारावी निकाल 2021 – mahresult.nic.in वर आपला निकाल कसा पाहाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने HSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर होईल.

  • HSC Result 2021 – निकाल नेमका कसा पाहाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.

  • नेमका निकाल कसा पाहता येणार?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर M876544 असेल आणि तुमच्या आईचे नाव अनिता असं असेल तर तुम्ही M876544 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANI असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल आपल्यासमोर काही क्षणात दिसू लागेल.

    follow whatsapp