Palghar sex racket : पालघरमधून मोठं सेक्स रॅकेटचं प्रकरण बाहेर आलं आहे. पोलिसांनी याच सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या संबंधित कारवाईत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील एकूण पाच महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. यापैकी अनेक महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले. तपासातून असे दिसून आले की, पीडित महिलांची वेगवेगळ्या राज्यांमधून आणि सीमेपलीकडून पालघर येथे तस्करी करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ट्रकने दिली मोटारसायकलला धडक, नवऱ्याने वाहनांना थांबण्याची हात जोडून केली विनंती, अखेर नवऱ्याने बायकोचा मृतदेह गाडीला बांधला...
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाला वसईतील नायगाव परिसरातील एका ठिकाणी सेक्स रॅकेट सुरू असल्याचे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी 26 जुलै रोजी छापा टाकल्यानंतर पाच महिलांना आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना एका सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. त्या महिला या नवी मुंबई, पुणे, गुजरात आणि कर्नाटकातील होत्या. तर काही महिलांचे बांगलादेशातून तस्करी करून आणल्या आणि नंतर त्यांना वेश्यव्यवसायात ढकलण्यात आलं.
नऊ जणांना अटक
पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या सेक्स रॅकेटचा मुख्य म्होरक्या मोहम्मद खालिद अब्दुल बापारी (वय 33) याचा समावेश आहे. तो देशभरातलील काही मुलींची तस्करी करून वेश्यव्यवसायात ढकलतो. त्यातून त्याला आर्थिक फायदा मिळतो, असे बोलले जाते. मोहम्मद खालिद अब्दुल बापारी व्यतिरिक्त दलाल जुबैर हारून शेख (वय 38), शमीम गफ्फार सरदार (वय 39) आणि इतर दोन महिलांचाही यात समावेश होता, त्यांना आता ताब्यात घेण्यात आले.
इंजेक्शन देत गरम चमच्याने चटके दिले
छाप्यादरम्यान, सापडलेल्या एका अल्पवयीन पीडितेने पोलिसांसमोर धक्कादायर खुलासा करण्यात आला. तिने सांगितले की, तिला बांगलादेशहून फसवून भारतात आणले गेले. तिथे पोहोचतचा त्यांना इंजेक्शन देण्यात आणले. एवढंच नाही,तर चमचा गरम करून अनेकदा चटकेही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. त्यानंतर 27 जुलै रोजी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
हे ही वाचा : बीड हादरलं! तृतीयपंथीयाने पीडितेला कामाचे आमिष दाखवले अन् नेलं खोलीत, नंतर साथीदारांच्या मदतीने आळीपाळीने...
संबंधित प्रश्न :
प्रश्न १) सेक्स ही घटना कुठे घडली?
ही घटना पालघर येथील आहे.
प्रश्न २) कोणत्या देशातून महिलांची तस्करी केली?
बांगलादेशातून महिलांची तस्करी झाली
ADVERTISEMENT
