मुंबईची खबर: मुंबईकर आता चक्क 'रोपवे'ने प्रवास करणार ना भाऊ!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून मेट्रो लाईन 3 वरील आरे स्टेशन आणि गोरेगाव येथील फिल्म सिटी दरम्यान रोपवे कनेक्टिव्हिटीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी पर्यंत 'रोपवे' ची योजना...

आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी पर्यंत 'रोपवे' ची योजना...

मुंबई तक

12 Aug 2025 (अपडेटेड: 21 Aug 2025, 06:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून नवा प्रोजेक्ट

point

आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी पर्यंत 'रोपवे' ची योजना...

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईत फिल्म सिटीला जाण्याचा मार्ग आणखी सोपा होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून मेट्रो लाईन 3 वरील आरे स्टेशन आणि गोरेगाव येथील फिल्म सिटी दरम्यान रोपवे कनेक्टिव्हिटीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. भविष्यात, ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत (SGNP) देखील वाढवता येईल. फिल्म सिटीसारख्या वर्दळीच्या भागात सार्वजनिक वाहतूकीच्या सुविधा कमी असतात. त्यामुळे अशा भागांमध्ये लोकांचा प्रवास सोपा करण्याचा या रोपवेचा उद्देश आहे. 

हे वाचलं का?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) च्या अधिकाऱ्याने मंगळवारी या प्रोजेक्टसंदर्भात माहिती दिली. तसेच, या प्रोजक्टचं काम सुरुवातीच्या टप्प्यात असून बजेट किंवा वेळेचा अंदाज लावला नसल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रोजेक्टमध्ये मोनो-केबल, बाय-केबल किंवा ट्राय-केबल डिटॅचेबल गोंडोला सिस्टिमचा वापर केला जाऊ शकतो. तपासानंतरच कोणती प्रणाली योग्य? हे निश्चित करण्यात येईल. 

PPP मॉडेल अंतर्गत होणार रोपवे

या रोपवेची पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (PPP) मॉडेल अंतर्गत निर्मिती करण्यात येईल. यामध्ये खाजगी कंपन्या पैसे लावतील, त्यासोबत सरकार देखील मदत करेल. डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्सफर (DBFOT) फ्रेमवर्क अंतर्गत याची नोकरी होऊ शकते. कोलाबा-बांद्रा-सीप्ज मेट्रो कॉरिडोरला मेट्रो लाइन 3 च्या नावाने देखील ओळखलं जातं. याची लांबी सुमारे 33.5 किलोमीटर असून ही अंडरग्राउंड मेट्रो लाइन आहे. याचा एक भाग सुरू करण्यात आला असून दुसऱ्याची बांधणी सुरू आहे. 

हे ही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये स्क्रीनवर अचानक पॉर्न व्हिडीओ... नेमकी घटना काय?

किती प्रवासी करु शकतील प्रवास? 

मेट्रो लाइन 3 स्थानकांपासून दूर परिसरात सहरित्या पोहचता यावं, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या रोपवे प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. हे कॉरिडोर 2 ते 3 किलोमीटर लांब असून यामधून प्रत्येक तासाला एका दिशेत 2,000 ते 3,000 प्रवासी प्रवास करु शकतील. फिल्म सिटी संजय गांधी नॅशनल पार्कजवळ असल्याकारणाने तिथे दररोज बरेच कर्मचारी आणि पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. मात्र, त्या ठिकाणी पुरेशा सार्वजनिक वाहतूक सुविधा नसल्यामुळे त्या मार्गावर नेहमी कोंडी पाहायला मिळते. 

हे ही वाचा: 8 महिन्यांच्या पुतणीवरच भाळला! घरात कोणीच नसताना केलं घृणास्पद कृत्य अन्... कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...

काय आहे अधिकाऱ्यांचं मत? 

अधिकाऱ्यांच्या मते, रोपवे मुळे पर्यावरणाचं कमी प्रमाणात नुकसान होईल. या प्रोजेक्टमध्ये रस्त्यांऐवजी केबलचा वापर केला जाईल. यासाठी कमी जमीन लागेल आणि हिरवळीचे क्षेत्र वाचेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास तो मेट्रोशी जोडल्या जाणाऱ्या आणि शहरातील वाहतूकीचा महत्त्वाचा भाग असलेला देशातील रोपवेंपैकी एक रोपवे असेल. 

    follow whatsapp