गुढीपाडव्याला महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

• 08:06 AM • 31 Mar 2022

कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. तसंच कोरोनाचे निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथील करण्यात आले आहेत. अशात चर्चा सुरू झाली ती राज्य निर्बंधमुक्त होणार का? याची. गुढीपाडव्याला राज्य निर्बंधमुक्त होईल असंही सांगितलं जातं. या सगळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? राजेश टोपे यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर म्हणाले… […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाची साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. तसंच कोरोनाचे निर्बंधही मोठ्या प्रमाणावर शिथील करण्यात आले आहेत. अशात चर्चा सुरू झाली ती राज्य निर्बंधमुक्त होणार का? याची. गुढीपाडव्याला राज्य निर्बंधमुक्त होईल असंही सांगितलं जातं. या सगळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात मास्कमुक्ती होणार का? राजेश टोपे यांनी दिलं अत्यंत महत्त्वाचं उत्तर म्हणाले…

काय म्हणाले आहेत अजित पवार?

आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर रात्रीपर्यंत गुढीपाडव्याच्या संदर्भातली नियमावली खासकरून शोभायात्रांना संमती दिली जाणार की नाही ते स्पष्ट होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच याबद्दलचा निर्णय घेतील. आज दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सगळ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी काय म्हणाले अजितदादा?

अनिल परब या खात्याचे मंत्री आहेत. मागेच सांगितलं होतं की, 31 मार्चपर्यंत सर्वांना संधी द्या. तशी संधी सर्वांना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापासून यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.ज्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी नवी भरतीही होऊ शकते. किंवा बेस्ट, पीएपीएलनं इलेक्ट्रॉनिक बसेस आणि सीएनजीच्या बस प्रति किलोमीटर घेतल्या आहेत. त्यामध्ये कॉट्रॅक्टमध्ये पंतप्रधान पुण्यात आले होते, त्यावेळीही 100 बसेसचं उद्घाटन झालं.

त्या एका कंपनीनं घेऊन पीएमपीएलला वापरायला दिल्या आहेत. तो हिशोब काढला तर हे अत्यंत कमी खर्चिक आहे. तसेच याचे फायदेही अनेक होतात. आपण एसटी कर्मचाऱ्यांना 10 तारखेला पगार देण्याचं कबुल केलं आहे. विलिनिकरण नाहीच म्हणून सांगितलं. कारण त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जो आला, तो मंत्रिमंडळानं तो स्विकारला. त्यात त्यांनी सूचवलेल्या गोष्टी मंत्रिमंडळानं पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो..: अजित पवार

मास्कमुक्ती संदर्भात काय म्हणाले होते राजेश टोपे?

मास्कमुक्तीच्या संदर्भात एक गोष्ट आहे ती अशी आहे, आपल्या देशात कोरोना आटोक्यात आलेला आहे. मात्र दुसऱ्या देशांमध्ये कोरोनाची चौथी लाटही आलेली आहे. त्याचे जे काही परिणाम आपण पाहतो आहोत ते पाहता मास्कमुक्त राज्य करणं हे थोडं धाडसाचं ठरेल. अगदीच मास्क घालायचा नाही हे योग्य नाही. गर्दीच्या ठिकाणी जात असू तिथे मास्क वापरणं आवश्यक आहे. जर आपल्याला कोणताही संसर्ग झाला असेल तर त्यापासून आपला आणि इतरांचा बचाव होऊ शकतो. आपण तूर्तास तरी मास्कमुक्तीचा कोणताही विचार केलेला नाही. ज्यावेळी तशी परिस्थिती वाटेल तेव्हा मुख्यमंत्री त्या संदर्भातली घोषणा करतील.”

    follow whatsapp