गळ्यात मंगळसूत्र घातलं की वाटतं नवऱ्याने गळा पकडला आहे असं वाटतं हे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे. झी मराठीवरच्या बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. ज्या वक्तव्याची चर्चा चांगलीच रंगते आहे. याआधी झी वरच्याच एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस ३५ पुरणपोळ्या खायचे असं सांगितलं होतं. त्याचीही बरीच चर्चा झाली होती. अशात आता अमृता फडणवीस यांचं नवं वक्तव्य समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
‘देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करायचे अन्…’, सरकार स्थापनेवर अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी?
तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घालत नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलेने विचारला. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडलाय असं वाटतं, त्यामुळे मंगळसूत्र मी हातात घालते. यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे असं मला वाटतं.” त्यापुढे प्रश्न विचारणाऱ्या महिलेला उद्देशून त्या म्हणाल्या की तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलं आहे त्यामुळे नवऱ्याने तुमचा गळा पकडला आहे असं तुम्हाला वाटत असेल.
अमृता फडणवीस यांना सुबोध भावेने काय प्रश्न विचारला?
अमृता फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आणि एकच हशा पिकला. अभिनेते सुबोध भावे हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रोमोत सुबोध भावे विचारतात अमृताजी तुम्ही देवेंद्रजींना लपवून काही खरेदी करता का? ज्यावर मी काय घाबरते का त्यांना? असं मिश्किल उत्तर अमृता फडणवीस देताना दिसत आहेत.
अमृता फडणवीस यांना तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा प्रश्न विचारला गेला. त्याचंही त्यांनी उत्तर दिलं. यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. मला खूप लोकांनी यावरून ट्रोल केलंय. प्लास्टिक सर्जरी ही खूप हिंमतीची गोष्ट आहे. एक त्यात मोठी रिस्क आहे ती म्हणजे सर्जरी केल्यानंतर काही बिघडलं तर सगळे फिचर्स बिघडतात. लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरमध्येही गेली नाही. लग्नाच्यावेळीही जो मेक अप केला जातो तेवढा केला होता. देवेंद्रजींची एक खासियत आहे ते स्त्रीचा चेहरा पाहात नाहीत तिच्या मनाचं सौंदर्य पाहतात असंही उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं.
ADVERTISEMENT
