अशोक चव्हाण म्हणाले 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' यशोमती ठाकूरांनी चांगलंच झापलं म्हणाल्या, 'वडिलांची प्रतिमा...'

Ashok chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' असं वक्तव्य केलं. ते नांदेडमधील भाजपच्या एका स्थानिक प्रचारसभेत 8 जानेवारी रोजी बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

ashok chavan

ashok chavan

मुंबई तक

09 Jan 2026 (अपडेटेड: 09 Jan 2026, 02:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' अशोक चव्हाणांचं वक्तव्य

point

यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोला

Yashomati Thakur Slam Over Ashok Chavan Statement : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी 'रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण' असं वक्तव्य केलं. ते नांदेडमधील भाजपच्या एका स्थानिक प्रचारसभेत 8 जानेवारी रोजी बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाणांनी पक्ष बदलला, संस्कृती बदलली आणि मतदारांचा अपमान केला असल्याचं म्हणत त्यांनी अशोक चव्हाणांचे कान टोचले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांना मेहनतीचं फळ प्राप्त होणार, तर काहींनी... काय सांगतं राशीभविष्य?

यशोमती ठाकूर यांचा अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, 'आदर्श चव्हाण का अच्छा अशोक चव्हाण. अशोक चव्हाण यांनी मोठी गफलत केली, त्यांनी आपली स्वत:ची किंमत स्वत: कमी करून घेतली आहे. नंतर त्यांनी आरोप करत सांगितलं की, घोटाळे करून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण आपल्याच वडिलांची प्रतिमा विसरू लागले आहेत'.

हे ही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपने केला टप्प्यात कार्यक्रम.. अंबरनाथमध्ये काय-काय घडलं? क्रोनोलॉजी घ्या समजून.. तुम्हीही जाल चक्रावून!

'अशोक चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य खालच्या पातळीचे असून ते राजकारणाची पातळी विसरू लागलेत. अशा घाणेरड्या गोष्टी बोलून नंतर ते समाजात चुकीचा संदेश पसरवत आहेत', असे त्यांनी वक्तव्य केलं. तसेच नंतर त्या म्हणाल्या की, 'पक्ष बदलल्यानंतर त्यांनी संस्कृती, भाषा, संस्कार आणि विचारधारा देखील बदलली आहे. मतदारांची किंमत केवळ एका मटणापर्यंत करत नाही. मतदारांचा अवमान करणारे हे वक्तव्य निषेध निषेधार्थ आहे', असं त्या म्हणाल्या.

    follow whatsapp