Sumeet Raghavan : आरे आंदोलन फाल्तू आणि बोगस, त्या व्हीडिओमुळे होतोय प्रचंड ट्रोल

मुंबई तक

• 05:46 AM • 03 Dec 2022

मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे कारशेडवरून वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला अभिनेता सुमीत राघवनने पाठिंबा दिला आहे. त्याने आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर अनेकदा टीका केली आहे. अशात त्याने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे सुमीत राघवनला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. काय आहे सुमीत राघवनने केलेलं ट्विट? सुमीतनं एक ट्विट रिट्विट केलं आहे. एका व्यक्तीनं एक […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या गोरेगावमध्ये आरे कारशेडवरून वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला अभिनेता सुमीत राघवनने पाठिंबा दिला आहे. त्याने आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर अनेकदा टीका केली आहे. अशात त्याने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे सुमीत राघवनला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.

हे वाचलं का?

काय आहे सुमीत राघवनने केलेलं ट्विट?

सुमीतनं एक ट्विट रिट्विट केलं आहे. एका व्यक्तीनं एक व्हिडिओ शेअर केलाय. ‘फ्रेंचचे नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना’ असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. यानंतर सुमीतने असं म्हटलं आहे की आरेच्या आंदोलकांच्याबाबतीतही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले होते, बोगस फाल्तू लोक. ना कामाचे ना धामाचे असं म्हणत सुमीत राघवनने आंदोलकांवर टीका केली आहे. त्यावरून आता त्याला प्रचंड ट्रोल केलं जातं आहे.

सुमीत राघवनच्या या ट्विटनंतर अनेक पर्यावरणप्रेमींनी टीका केली आहे. आम्हालाही मेट्रो हवी आहे, पण मुंबईत इतक्या मोकळ्या जागा असताना आरेतलं पर्यावरण नष्ट करण्याचा घातलेला घाट चुकीचा आहे या आशयाची ट्विट करत सुमीतला लक्ष्य करण्यात आलं आहे.

काही महिन्यांपूर्वीही केलं होतं ट्विट

काही महिन्यांपूर्वी देखील सुमीतनं असंच ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये त्यानं म्हटलं होतं की, एक वेगळाच आवाज ऐका. मी स्वत: नेहरू नगर, कुर्ला (पू) चा आहे आणि माझी आणि माझ्या बरोबर बऱ्याच मुंबईकरांची अशी मागणी आहे की हा वाद आता पुरे. आम्हाला मुंबई मेट्रोचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं आहे. राहिला मुद्दा कारशेडचा,तर #कारशेड वहीं बनेगा.. म्हणजे कुठे? तर आरे मध्येच.

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलं होतं सुमीत राघवनने?

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सुमीतला एक प्रश्न विचारण्यात आला की तू ट्रोलिंगची पर्वा न करता कायम जे चुकीचं घडतं आहे ते मांडत असतोस. त्यावर उत्तर देताना सुमीत म्हणाला, “मला डोळे बंद करुन चालता येत नाही. मी डावी-उजवीकडे बघतो आणि मग त्याच्यावर भाष्य करतोच मी. मी देश आणि विदेश फिरलेला माणूस आहे. मी जेव्हा लंडनच्या मेट्रोमध्ये फिरतो तिथल्या ट्युबमध्ये बसतो तेव्हा माझ्या मनात हे येतंच की यांच्याकडे हे 170 वर्षांपूर्वी आलेलं आहे. आपल्याकडे हे अजून का येत नाही? अजूनही आरे किंवा कांजूरवरुन भांडण का होतंय? मेट्रोने प्रवास करणार आहे तो मुंबईकर मग त्याला प्राधान्य का दिलं जात नाही? त्याचं काय चुकलंय? मुंबईकर किती दिवस लोकल आणि बेस्टमधून लोंबकळत जाणार. त्याने एसीतून प्रवास का नाही करायचा? अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर मी व्यक्त होतो. मी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतल्या रस्त्यांची दुरवस्थाच पाहतो आहे. मला अशा समस्या सहन होत नाही त्यामुळे त्यावर बोलतो आणि बोलणारच.” असं उत्तर सुमीतने दिलं आहे.

    follow whatsapp