9 वीत शिकणाऱ्या मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून तरुण करायचा टॉर्चर, पीडितेनं रेल्वेखाली उडी मारून संपवलं जीवन

Crime News : तरुणाने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर अनेकदा तिचा विनयभंग केला. संबंधित मुलगी ही इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती. संबंधित विद्यार्थीनीने ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं.

Crime News

Crime News

मुंबई तक

19 Mar 2026 (अपडेटेड: 19 Mar 2026, 01:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल 

point

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Crime News : एका तरुणाने अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले, नंतर अनेकदा तिचा विनयभंग केला. संबंधित मुलगी ही इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत होती. संबंधित विद्यार्थीनीने ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. ही घटना पंजाबमधील मोहाली येथील असल्याचे वृत्त आहे. संबंधित प्रकरणात मयताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मालमत्तेच्या कारणावरून महिलेची निर्घृण हत्या, मृतदेहाचे करवतीने तुकडे केले अन् तलावात दिले फेकून...

तरुणीचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल 

वडिलांच्या तक्रारीत नमूद केलं, जीआरपीने आरोपी तरुणाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे, अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणे याच आरोपांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

मयत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, मुलगी ही मूळची उत्तर प्रदेशची आहे. रोजगारासाठी आम्ही येथे स्थायिक झाला होतो. मजुरीच्या कामावरच आमचा उदरनिर्वाह आहे. एक रीशू नावाचा तरुण मुलीचा छळ करत होता. आरोपीने फसवणूक करून विद्यार्थीनीचा एक अश्लील व्हिडिओ बनवला होता, नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. 

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, आरोपी या व्हिडिओचा वापर करून विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण करत होता. 12 मार्च रोजी आरोपी दारूच्या नशेत त्यांच्या घरी आला आणि विद्यार्थीनीला जबरदस्ती सोबत घेऊन गेला होता. बराच वेळ झाला तरी ती न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती, नंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. 

हे ही वाचा : पुणे : कबुतर पाहायला थांबले, कुत्रा भुंकल्याने पळू लागले; कबुतर चोरल्याच्या संशयावरुन लोकांकडून मारहाण, एकाचा मृत्यू

दरम्यान, 13 मार्च रोजी रेल्वे रुळावर एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा पुढील तपास केला. मृताची ओळख पटल्यानंतर 9 वीच्या वर्गातील विद्यार्थीनीचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रेल्वेतून पळून जाताना त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

    follow whatsapp