Deepak Kesarkar : पहिली, दुसरीच्या परीक्षा रद्द; तिसरी ते आठवी सर्व विद्यार्थी पास होणार

मुंबई : पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणात्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले. केरळ मॉडेल आधरित शिक्षण पद्धती : केसरकर […]

Mumbai Tak

ऋत्विक भालेकर

• 12:08 PM • 22 Nov 2022

follow google news

मुंबई : पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा तर तिसरी ते आठवीच्या कोणात्याही विद्यार्थ्यांला नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. याशिवाय महाराष्ट्रात केरळ मॉडेल आधारित शिक्षण पद्धती राबविण्याचे सुतोवाचही केसरकर यांनी केले.

हे वाचलं का?

केरळ मॉडेल आधरित शिक्षण पद्धती :

केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत, ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे, त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात केरळने शिक्षण विभागात अनेक प्रयोग केले, अनेक इनिशिएटिव्ह केरळने शिक्षणात घेतले आहेत. काही मॉडेल जे यशस्वी झालेत ते पुढे न्यावे लागतात. केरळ आणि महाराष्ट्राची तशी तुलना करता येणार नाही. पण केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

पहिली, दुसरीच्या परीक्षा रद्द :

परीक्षांबाबत बोलताना केसरकर म्हणाले, पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी लहान असतात, त्यामुळे त्यांची परीक्षा घेतली जाणार नाही. तिसरीपासून पुढील इयत्तेसाठी परीक्षा घेतल्या जातील. त्यांची परीक्षा जरी घेतली जाणार असली तरी आठवीपर्यंत कोणालाही नापास केलं जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.

पुस्तकाला वह्या जोडणार :

यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांच्या पुस्तकाला वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. पुढील वर्षीपासून अशी पुस्तकं आणि त्याला वह्यांची पानं जोडली जातील. प्रत्येक पुस्तक तीन भागात विभागले जाईल. म्हणजे तीन महिन्याला पुस्तक बदलावा लागेल. याच विभागलेल्या पुस्तकाला वह्यांची पानं असतील. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा झालेला अभ्यास त्याचं वह्यांच्या पानावर लिहतील, अशी योजना असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.

    follow whatsapp