कामगारांसाठी शिजवलेल्या भातात आढळल्या माश्या; आमदार बांगरांना राग अनावर, लगावली कानशिलात

मुंबई तक

• 11:28 AM • 15 Aug 2022

ज्ञानेश्वर पाटील हिंगोली: राज्यात बांधकाम कामगारांना वेळेत आरोग्यदायी भोजन मिळावं म्हणून सरकारने मध्यान भोजन योजना सुरु केली आहे. हिंगोलीत मात्र कामगारांना निकृष्ट दर्जाच जेवण पुरवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी याप्रकाराचा भांडाफोड केला आहे. संतोष बांगर यांनी उद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन पाहणी केली असता कामगारांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट […]

Mumbaitak
follow google news

ज्ञानेश्वर पाटील

हे वाचलं का?

हिंगोली: राज्यात बांधकाम कामगारांना वेळेत आरोग्यदायी भोजन मिळावं म्हणून सरकारने मध्यान भोजन योजना सुरु केली आहे. हिंगोलीत मात्र कामगारांना निकृष्ट दर्जाच जेवण पुरवलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी याप्रकाराचा भांडाफोड केला आहे. संतोष बांगर यांनी उद्योगिक वसाहतीमध्ये जाऊन पाहणी केली असता कामगारांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट असल्याचे समोर आले.

शिजवलेल्या भातात आढळल्या माश्या

कामगारांसाठी शिजवलेल्या भातात माश्या आढळून आल्या. डाळ आणि करपलेल्या पोळ्या पाहून आमदार बांगर यांनी व्यवस्थापकाला जाब विचारल्या नंतर व्यवस्थापकाने बांगर यांना मेन्यू दाखवला मात्र मेन्यू प्रमाणे जेवण नसल्यामुळे बांगर संतापले, राग अनावर न झाल्यामुळे आमदार बांगर यांनी व्यस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. यानंतर बांगर यांनी फोन वरुन कंपनी मालकाची चांगलीच कानूघडणी केली. या संदर्भात तातडीने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संतोष बांगर या प्रकरणावर काय म्हणाले?

गरीब लोकांना मध्यान्ह भोजनात जे जेवण येत आहे त्यामध्ये डाळ, कपरलेल्या पोळ्या, भात हे अतिशय खराब दर्जाचे आहे. हे म्हणजे सरकारला लुटण्याचा प्रकार सुरु आहे. टेंडर घेतलेला माणूस मला मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होता. तिथल्या अधिकाऱ्यांनेही मला उडावाउडवीची उत्तरं दिली. घडलेल्या प्रकराच्या ठिवाणाहून तब्बल ४८ हजार लोकांना जेवण जातं. खराब हरभऱ्याची डाळ, लसून खराब दर्जाचा, सडलेला कांदा याठिकाणी वापरली जाते असल्याची माहिती संतोष बांगर यांनी दिली आहे.

उपहारगृहाच्या मेनूकार्डमध्ये गाजर, काकडी, गुळ, चपाती, तुर डाळ अशा गोष्टी आहेत. परंतु, प्रत्यक्षात वेगळ्याच गोष्टी खायला दिल्या जात आहेत. हे सर्व सरकारला लुटण्याचा प्रकार सुरु असल्याचं संतोष बांगर म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

    follow whatsapp