भोंग्यांबाबत राज ठाकरेंना पुन्हा बाळासाहेबांची आठवण, व्हीडिओ पोस्ट करत म्हणाले….

मुंबई तक

04 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चर्चा आहे. मशिदींवरच्या भोंग्याना दिलेल्या अल्टिमेटममुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. बुधवारीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून भूमिकाही जाहीर केली आहे. अशात आज राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे. या ट्विटचीही चांगलीच चर्चा रंगते […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चर्चा आहे. मशिदींवरच्या भोंग्याना दिलेल्या अल्टिमेटममुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. बुधवारीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून भूमिकाही जाहीर केली आहे. अशात आज राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे. या ट्विटचीही चांगलीच चर्चा रंगते आहे.

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांना पत्र लिहून आवाहन केलं आहे त्या पत्रात त्यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात सगळे एकत्र या असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्या आवाहनाचे पडसाद नाशिक, ठाणे आणि जळगावमध्ये उमटलेले पाहण्यास मिळत आहेत. आता आज राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हीडिओ ट्विट केला आहे.

“भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

काय आहे व्हीडिओत?

या व्हीडिओत बाळासाहेब ठाकरे सांगत आहेत, “ज्या दिवशी माझं सरकार महाराष्ट्रात येईल त्यावेळी रस्त्यावर केले जाणारे नमाज आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा तुम्हाला कुणाला उपद्रव होत असेल तर त्यांनी आम्हाला येऊन सांगावं आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. आमचं सरकार आलं तर मशिदींवरचे लाऊड स्पीकर खाली येतील”

१९९५ ला महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं होतं. त्याआधीच्या प्रचारसभेत बाळासाहेब ठाकरेंनी जे भाषण केलं होतं तो हा व्हीडिओ आहे. याचं साल कोणतं होतं हे निश्चितपणे सांगता येणार नाही हे मात्र नक्की.

मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंनी बुधवारच्या पत्रातही करून दिली होती बाळासाहेब ठाकरेंची आठवण

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की कै. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावं. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे आणि बाळासाहेबांचं ऐकणार आहात की नाही याचा फैसला लावा असंही म्हटलं आहे.

    follow whatsapp